हेरगिरीप्रकरणी चौथी अटक, सपा नेत्याचा निकटवर्तीय पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Published: October 29, 2016 12:56 PM2016-10-29T12:56:54+5:302016-10-29T13:06:15+5:30

हेरगिरीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं आणखी एकाला अटक केली असून तो समाजवादी पक्षातील नेत्याचा निकटवर्तीय असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.

Four arrested in the serial blasts | हेरगिरीप्रकरणी चौथी अटक, सपा नेत्याचा निकटवर्तीय पोलिसांच्या जाळ्यात

हेरगिरीप्रकरणी चौथी अटक, सपा नेत्याचा निकटवर्तीय पोलिसांच्या जाळ्यात

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 - हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरवर कारवाई केल्यानंतर क्राईम ब्रांचनं याप्रकरणात आता चौथ्या व्यक्तीला अटक केली आहे. फाहत असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो समाजवादी पक्षातील मुनावर सलीम यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. 
 
याआधी शुक्रवारी राजस्थानमधून पाकिस्तानी हेर शोएबला अटक करण्यात आली होती. तसंच पाकिस्तानी अधिकारी मोहम्मद अख्तरला मदत करणा-या मौलाना रमजान आणि सुभाष जांगिड या दोघांना गुरुवारी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. 
 
आणखी बातम्या
(राजस्थानमधून आणखी एक पाकिस्तानी हेर ताब्यात)
(हेरगिरी करणा-या पाक अधिका-यावर कारवाई, नंतर सुटका)
या दोघांना पटियाला हाऊस कोर्टाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांवर अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानी अधिकारी मोहम्मद अख्तरपर्यंत पोहोचवण्याचा आरोप आहे. क्राईम ब्रांचने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरला हेरगिरीच्या आरोपावरुन ताब्यात घेतले होते. 
 
या कारवाईनंतर काही वेळाने त्याची सुटका करण्यात आली असून त्याला तातडीने भारत सोडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. या पाकिस्तानी अधिका-याकडे भारतीय लष्करासंबंधी अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती असलेली कागदपत्रं आढळून आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हा अधिकारी पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे. 
 

Web Title: Four arrested in the serial blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.