दुचाकीच्या डिक्कीतून पावणे चार लाख लांबविणार्यास अटक
By admin | Published: January 8, 2016 11:20 PM2016-01-08T23:20:16+5:302016-01-08T23:20:16+5:30
जळगाव: जिल्हा बॅँकेजवळ लावलेल्या दुचाकीतून तीन लाक ८२ हजार रुपये लांबविणार्या टारझन उर्फ बल्लू अरुण दहेकर या चोरट्यास जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संजय दिनकर पाटील (वय ४२ रा.पिंप्राळा मुळ गाव बांबरुड ता.भडगाव) हे २९ डिसेंबर १५ रोजी गणेश कॉलनीतील जिल्हा बॅँके शाखेजवळ थांबलेले असताना टारझन, मंगल दिवाने, अजय गारुंगे व रामप्रकाश तमायचेकर या चौघांनी त्यांच्या दुचाकीची (एम.एच.१९ सी.जे.१०८६) डिक्की फोडून त्यातील तीन लाख ८२ हजार रुपयांची रोकड लांबविली होती. या चौघांवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ात टारझनने साडे तीन लाख रुपये पोलिसांना काढून दिले आहेत तर उर्वरित रक्कम वसूल करावयाची बाकी आहे. त्याचे तिघे साथीदार मात्र अद्याप फरार आहेत. न्या.संगी
Next
ज गाव: जिल्हा बॅँकेजवळ लावलेल्या दुचाकीतून तीन लाक ८२ हजार रुपये लांबविणार्या टारझन उर्फ बल्लू अरुण दहेकर या चोरट्यास जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संजय दिनकर पाटील (वय ४२ रा.पिंप्राळा मुळ गाव बांबरुड ता.भडगाव) हे २९ डिसेंबर १५ रोजी गणेश कॉलनीतील जिल्हा बॅँके शाखेजवळ थांबलेले असताना टारझन, मंगल दिवाने, अजय गारुंगे व रामप्रकाश तमायचेकर या चौघांनी त्यांच्या दुचाकीची (एम.एच.१९ सी.जे.१०८६) डिक्की फोडून त्यातील तीन लाख ८२ हजार रुपयांची रोकड लांबविली होती. या चौघांवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ात टारझनने साडे तीन लाख रुपये पोलिसांना काढून दिले आहेत तर उर्वरित रक्कम वसूल करावयाची बाकी आहे. त्याचे तिघे साथीदार मात्र अद्याप फरार आहेत. न्या.संगीता शिंदे यांच्या न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.घरफोडी करणारा अटकेतशनी पेठमध्ये अब्दुल रहिम शेख फरीद यांच्या घरात चोरी करुन २६ हजार रुपयांचे दागिने लांबविणार्या सय्यद वहीद सय्यद बशीर (वय ३८ रा.शनी पेठ) याला शनी पेठ पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्या.ए.डी.बोस यांनी १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.महेंद्र फुलपगारे यांनी काम पाहिले.