आईला आपल्याकडे ठेवण्यासाठी चार भाऊ आपापसात भिडले, कोर्टात गेले, अखेर आई म्हणाली मी धाकट्या मुलाकडे राहीन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:20 PM2021-10-05T19:20:13+5:302021-10-05T19:31:13+5:30

Family News: सर्वसाधारणपणे आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यास मुले टाळाटाळ करतात, असं दिसून येतं. अनेकदा आई-वडिलांना वृद्धाश्रमाचीही वाट दाखवली जाते. मात्र हे प्रकरण जरा वेगळंच आहे

Four brothers rushed to the court to keep their mother with them, finally the mother said I will stay with the youngest child | आईला आपल्याकडे ठेवण्यासाठी चार भाऊ आपापसात भिडले, कोर्टात गेले, अखेर आई म्हणाली मी धाकट्या मुलाकडे राहीन

आईला आपल्याकडे ठेवण्यासाठी चार भाऊ आपापसात भिडले, कोर्टात गेले, अखेर आई म्हणाली मी धाकट्या मुलाकडे राहीन

googlenewsNext

भोपाळ - सर्वसाधारणपणे आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्यास मुले टाळाटाळ करतात, असं दिसून येतं. अनेकदा आई-वडिलांना वृद्धाश्रमाचीही वाट दाखवली जाते. मात्र हे प्रकरण जरा वेगळंच आहे. वृद्ध आईला आपल्याकडे ठेवण्यासाठी चार भाऊ आमने-सामने आले आणि आईच्या ताब्यासाठी कोर्टापर्यंत गेल्याची घटना समोर आली आहे. अखेर ८५ वर्षीय आई सरजूबाईच्या इच्छेनुसार ती छोट्या मुलाकडे राहील, असा निर्णय झाला. तसेच जेव्हा कधी तिची आपल्या इतर मुलांना भेटण्याची इच्छा होईल, तेव्हा ती जाऊ शकेल. ही घटना मध्य प्रदेशमधील देवास येथे घडली आहे. (Four brothers rushed to the court to keep their mother with them, finally the mother said I will stay with the youngest child) 

याबाबतची सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे, ऑगस्टमध्ये सीआयएसएफमधून निवृत्त झालेला सर्वात लहान मुलगा प्रल्हादसिंग उर्फ मोनू हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी मोठे भाऊ परमानंद यांच्याकडे गेले. मात्र परमानंद यांनी त्यांना आईला भेटू दिले नाही. त्यानंतर मोनू यांनी २ सप्टेंबर रोजी एसडीएम कोर्टामध्ये यासंदर्भात अर्ज दिला. या अर्जामध्ये त्यांनी सांगितले की, मला माझ्या आईला भेटू दिले जावे. मी त्यांना आपल्याकडे ठेऊ इच्छिते. त्यावर एसडीएम प्रदीप सोनी यांनी कलम ९७ आणि ९८ अन्वये सर्च वॉरंट जारी केले. त्यानंतर पोलीस वृद्ध आईला जबाब नोंदवण्यासाठी परमानंद यांच्या घरातून कोर्टात घेऊन आले. तिथे या आईने ती धाकट्या मुलाकडे राहू इच्छित असल्याचे सांगितले. माझ्या स्वर्गिय पतींनी मला धाकट्या मुलाकडे राहायला सांगितले होते, अशी माहिती या आईने कोर्टात दिली.

आईच्या जबाबानंतर एसडीएमने तिला तिच्या धाकट्या मुलासोबत राहण्यास सांगितले. तसेच आई कुठल्याही मुलाकडे तिच्या इच्छेनुसार राहू शकते, असे मत नोंदवले. दरम्यान, देवासचे एसडीएम प्रदीप सोनी यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, कोर्टामध्ये आईने तिच्या धाकट्या मुलाकडे राहण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यानुसार तिला त्यांच्याकडे पाठण्यात आले आहे. मात्र धाकटा भाऊ आईचा योग्य पद्धतीने सांभाळ करणार नाही, अशी बाकीच्या तीन मुलांची तक्रार आहे. त्यामुळे आमचे पथक धाकट्या भावाच्या घरी जाऊन पाहणी करणार आहे.

दरम्यान, आईला आपल्याकडे ठेवण्यावरून सरजूबाईंच्या चारही मुलांमध्ये कोर्टाबाहेर वाद झाला. यावेळी विक्रम सिंह, कंचन सिंह, परमानंद या तिघांनी प्रल्हाद आणि त्यांच्या कुटुंबासोबत वाद घातला. हा वाद एवढा वाढला की, पोलिसांना पाचारण करावे लागले. दरम्यान, प्रल्हाद, त्यांची पत्नी आणि मुलीला मारहाण केल्या प्रकरणी विक्रम कंचन आणि परमानंद यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात अजून एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे सरजूबाईच्या नावावर काही जमीन आहे. तसेच चारही भाऊ त्यामुळेच आईला आपल्याकडे ठेवू इच्छित आहेत. त्यांच्यामते आई ज्याच्याकडे राहील त्यालाच जमीन मिळणार आहे. 

Web Title: Four brothers rushed to the court to keep their mother with them, finally the mother said I will stay with the youngest child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.