मंगल पाटील खून खटल्यात चौघे निर्दोष
By admin | Published: January 8, 2016 11:20 PM2016-01-08T23:20:43+5:302016-01-08T23:20:43+5:30
जळगाव: मंगल पाटील खून खटल्यात संशयित समाधान लालचंद पाटील, अनिल दगडू केदारे, मनोज जगन्नाथ भंगाळे व मंगलची पत्नी सुनीता मंगल पाटील या चौघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. मंगल याचा चार फेब्रुवारी २०१२ रोजी एका लग्नातून आल्यानंतर रात्री त्याचा मृतदेहच आढळला होता. दुचाकीच्या एक्सलेटरच्या वायरने गळा आवळून त्याचा मृतदेह शिरसोली रस्त्यावर टाकून त्याच्या अंगावरुन चारचाकी वाहने नेण्यात आले होते. अपघात झाल्याचे दर्शविण्यात आले होते. मंगल हा पावभाजीच्या गाडीवर कामाला होता. अनैतिक संबंधातून त्याचा खून केल्याच्या संशयावरुन या चौघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात २२ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व प्रमुख सत्र न्या. एम.ए.लव्हेकर यांनी शुक्रवारी चौघांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड.महेश भोकरीकर व
Next
ज गाव: मंगल पाटील खून खटल्यात संशयित समाधान लालचंद पाटील, अनिल दगडू केदारे, मनोज जगन्नाथ भंगाळे व मंगलची पत्नी सुनीता मंगल पाटील या चौघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. मंगल याचा चार फेब्रुवारी २०१२ रोजी एका लग्नातून आल्यानंतर रात्री त्याचा मृतदेहच आढळला होता. दुचाकीच्या एक्सलेटरच्या वायरने गळा आवळून त्याचा मृतदेह शिरसोली रस्त्यावर टाकून त्याच्या अंगावरुन चारचाकी वाहने नेण्यात आले होते. अपघात झाल्याचे दर्शविण्यात आले होते. मंगल हा पावभाजीच्या गाडीवर कामाला होता. अनैतिक संबंधातून त्याचा खून केल्याच्या संशयावरुन या चौघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात २२ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व प्रमुख सत्र न्या. एम.ए.लव्हेकर यांनी शुक्रवारी चौघांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड.महेश भोकरीकर व ॲड.पंकज अत्रे यांनी तर सरकारतर्फे ॲड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.