SBIच्या चुकीमुळेच विजय माल्ल्या पळाला; वकिलांनी दिला होता 'हा' महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 10:57 AM2018-09-14T10:57:06+5:302018-09-14T12:07:12+5:30

विजय माल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी SBI ला सावध केले होते.

Four days before Vijay Mallya flew out, lawyer told SBI to move court, stop him | SBIच्या चुकीमुळेच विजय माल्ल्या पळाला; वकिलांनी दिला होता 'हा' महत्त्वाचा सल्ला

SBIच्या चुकीमुळेच विजय माल्ल्या पळाला; वकिलांनी दिला होता 'हा' महत्त्वाचा सल्ला

Next

नवी दिल्ली - देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याबाबत रोज नवनवी माहिती समोर येत आहे. विजय माल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधीच सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी एसबीआयला सावध केले होते. बँकेने विजय माल्ल्याच्या विरोधात कोर्टात दाद मागावी असा सल्ला दवे यांनी बँकेला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच एसबीआयने विजय माल्ल्याला थांबवण्याबाबतचा कोणताही कायदेशीर सल्ला घेतला नाही असेही दवे यांनी म्हटले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टाचे वकील दुष्यंत दवे यांनी  विजय माल्ल्या भारतातून पळून जाऊ शकतो याची कल्पना एसबीआयचे संचालक आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांना दिली होती. मात्र त्यांनी माझा सल्ला ऐकला नाही. त्यामुळे विजय माल्ल्या देश सोडून जाऊ शकला. तसेच त्यांनी माल्ल्याविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे चार दिवसानंतर तो देश सोडून गेला.

विजय माल्ल्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यावर एसबीआयने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एसबीआयच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दुष्यंत दवे जे काही सांगत आहेत ते त्यांना सांगू दे आता मी एसबीआयची कर्मचारी नाही. तुम्ही याबाबत सध्याच्या संचालकांना किंवा अध्यक्षांना भेटू शकता असे उत्तर दिले.

एसबीआयचे कायदेविषयक सल्लागार आणि बँकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती दवे यांनी दिली. विजय माल्ल्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बैठक रविवारी पार पडली त्यानंतर सोमवारी मी त्यांची सुप्रीम कोर्टात वाट बघत होतो मात्र कोणीही आले नसल्याचं दवे यांनी सांगितलं. त्यानंतर विजय माल्ल्या ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळाला आहे 

Web Title: Four days before Vijay Mallya flew out, lawyer told SBI to move court, stop him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.