हजारो मधमाशांचा हल्ला; एकाच कुटुंबातील महिलेसह 3 मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 08:03 PM2024-09-23T20:03:49+5:302024-09-23T20:04:12+5:30

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

four-dies-in-bees-attack-in-jharkhand | हजारो मधमाशांचा हल्ला; एकाच कुटुंबातील महिलेसह 3 मुलांचा मृत्यू

हजारो मधमाशांचा हल्ला; एकाच कुटुंबातील महिलेसह 3 मुलांचा मृत्यू

Bees Attack : झारखंडच्या रांचीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तुपुदन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये एक महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. ही घटना 21 सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती आहे.

पीडितेचा पती सुनील बरला यांनी सांगितले की, त्याची पत्नी आपल्या मुलांसह तिच्या माहेरी गेली होती. त्यादरम्यान ही घटना घडली. महिला खुंटी जिल्ह्यातील कारा ब्लॉकची रहिवासी होती. तुपुदन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदग गडा टोली परिसरात असलेल्या तिच्या माहेरी ही घटना घडली. शनिवारी चौघे आंघोळीसाठी विहिरीवर गेले होते. यादरम्यान, अचानक मधमाशांच्या थव्याने त्यांच्यावर हल्ला केला.. 

मधमाश्या येताच लोकांमध्ये घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. मात्र महिला आणि तिची मुले यात अडकली. त्यांच्यावर हजारो मधमाश्यांनी हल्ला केला. यावेळी चौघांनी विहिरीत उडी मारली. गावातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: four-dies-in-bees-attack-in-jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.