गृह मंत्रालयाचे चार अधिकारी निलंबित
By admin | Published: September 1, 2016 11:57 PM2016-09-01T23:57:16+5:302016-09-01T23:57:16+5:30
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या एफसीआरए परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी साह्यभूत ठरल्याबद्दल गृहमंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांना गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - इस्लामचे धर्म प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांनी सुरू केलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या एफसीआरए परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी साह्यभूत ठरल्याबद्दल गृहमंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांना गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आले. नाईक यांची सध्या अनेक कारणांनी चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाही इस्लामिक फाऊंडेशनच्या एफसीआरए परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाला आढळले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी टि्वटरद्वारे दिली.
झाकीर नाईक सध्या देशाबाहेर आहे. झाकीर नाईकवर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षा यंत्रणांना तपास करण्यास सांगितलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) 2005 पासून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केली. हे सर्व दहशतवादी सिमी, लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिद्दीन आणि इसिस या संघटनांसाठी काम करताना पकडले गेले होते.
यात 3 पोलिसांचाही समावेश आहे. झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या नावे खातं नसून स्वत:च्या नावे असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. झाकीर आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या व्यवहारांचीही पोलीस माहिती घेत आहेत. अद्याप पोलिसांनी इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या कर्मचारी, अधिका-यांची चौकशी करण्यास सुरुवात केलेली नाही. 'आम्ही त्यांच्याकडे पैशांचा स्त्रोत, तसंच नाईक आणि ठेवीदारांमधील संबंधासंबंधी चौकशी करण्याची शक्यता आहे'. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.