४० तास चालले ‘आॅपरेशन संजुवां’ ४ अतिरेक्यांचा खात्मा : शहीद जवानांची संख्या ५ वर, गोळाबार थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:53 AM2018-02-12T00:53:25+5:302018-02-12T00:53:43+5:30
जम्मूतील सुंजवां येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यातील ४ अतिरेक्यांना मारण्यात ४० तासांनी सैन्याला यश आले आहे. तथापि, या चकमकीत सैन्याचे ५ जवान शहीद झाले असून, यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या भागात तपास मोहीम अद्याप सुरूच
सुंजवां (जम्मू) : जम्मूतील सुंजवां येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यातील ४ अतिरेक्यांना मारण्यात ४० तासांनी सैन्याला यश आले आहे. तथापि, या चकमकीत सैन्याचे ५ जवान शहीद झाले असून, यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या भागात तपास मोहीम अद्याप सुरूच असून, शनिवारी रात्रीपासून गोळीबार थांबला आहे.
जम्मू-काश्मीर लाइट इन्फन्ट्रीच्या ३६ ब्रिगेडच्या शिबिरावर शनिवारी जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात २ अधिकाºयांसह (जेसीओ) सैन्याचे ५ जवान शहीद झाले आहेत. यातील तिसरा अतिरेकीही सैन्याच्या वेशात होता. अन्य २ अतिरेक्यांप्रमाणेच त्याच्याकडेही मोठा शस्त्रसाठा होता. त्याच्याजवळून एके-५६ रायफल, गे्रनेड लाँचर आदी शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले की, सुरक्षा दलांनी ४ अतिरेक्यांना ठार मारले आहे. या भागातील घरांची झडती घेत असताना, एक अन्य अधिकारी, २ जवान आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह दिसून आला. या चकमकीत ६ महिला आणि मुलांसह १० जण जखमी झाले आहेत. हे सर्व लष्करी तळाजवळील निवासी भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, या हल्ल्यावरून राजकीय टीकाटिप्पणी होत असताना, अशा गोष्टींचे राजकारण करू नये, असे आवाहन भाजपाने केले आहे.
पाकच्या गोळीबारात महिला ठार
जम्मू : पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी केलेल्या तोफमाºयात एका महिलेचा मृत्यू झाला. नौसेराजवळ लायरन गावात परवीन अख्तर (६५) या महिलेचा पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू झाला. याशिवाय पाकिस्तानने पूंछमध्ये खादी कारमारा आणि चाकन दा बाघ या भागांतही तोफमारा केला. राजौरीच्या तरकुंडी, नायका, पंजग्रेन, खोरीनार आणि राजधानी गावासह पूंछच्या ६ गावांत पाकिस्तानने तोफमारा आणि गोळीबार केला.
जखमी गर्भवतीने दिला मुलीला जन्म
लष्करी तळाजवळ निवासी भागात चकमक सुरू असताना, यात एक गर्भवती महिला जखमी झाली. राइफलमॅन नजीर अहमद आणि त्यांच्या गर्भवती पत्नी हे गोळीबारात जखमी झाले. त्यांना तत्काळ सैन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या महिलेचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या महिलेने एका मुलीला जन्म दिला. आई व मुलीची प्रकृती चांगली आहे.
राहुल यांनी केला निषेध
या हल्ल्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निषेध केला आहे. त्यांनी टिष्ट्वट केले आहे की, या अतिरेकी हल्ल्याचा मी निषेध करतो. सर्व भारतीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन भारतीय सैन्याच्या जवानांसोबत उभे आहेत.