मुलीची छेड काढल्यावरून असोदा येथे दगडफेक चारजण जखमी : गावात तणावपूर्ण शांतता, पोलीस बंदोबस्त कायम

By Admin | Published: June 30, 2016 10:28 PM2016-06-30T22:28:38+5:302016-06-30T22:28:38+5:30

जळगाव: अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून असोदा (ता.जळगाव) येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी दगडफेक व लाठ्या काठ्यांचा वापर झाला.त्यात एका गटाचा एक तर दुसर्‍या गटाचे तीन असे चारजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठल्याने मोठा वाद टळला.

Four injured in Asda's whereabouts from girl's raids: Tension prevailed in police, police custody | मुलीची छेड काढल्यावरून असोदा येथे दगडफेक चारजण जखमी : गावात तणावपूर्ण शांतता, पोलीस बंदोबस्त कायम

मुलीची छेड काढल्यावरून असोदा येथे दगडफेक चारजण जखमी : गावात तणावपूर्ण शांतता, पोलीस बंदोबस्त कायम

googlenewsNext
गाव: अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून असोदा (ता.जळगाव) येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी दगडफेक व लाठ्या काठ्यांचा वापर झाला.त्यात एका गटाचा एक तर दुसर्‍या गटाचे तीन असे चारजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठल्याने मोठा वाद टळला.
असोदा गावातील कोळी वाडा येथील एका तरुणाने दोन दिवसापूर्वी धनजी नगरातील १६ वर्षीय तरुणीची छेड काढली होती. नातेवाईकांनी गुरुवारी संध्याकाळी त्या तरुणाच्या घरी जाऊन छेडखानीचा जाब विचारला असता महिलांमध्ये शिवीगाळ होऊन हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही गटातील शंभर ते दीडशेजण एकमेकावर चाल करून आले. यात दगडफेक,लाठ्या काठ्यांचा व विटांचा वापर झाला. वाद सोडविण्यासाठी आलेल्या चार जणांपैकी तिघांच्या डोक्यात विटांचा मारा झाला तर एकाला लोखंडी रॉड लागला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
गावात दंगलीचा अफवा
दरम्यान, गावात दंगल उसळल्याची अफवा पसरल्याने तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक निरीक्षक सागर शिंपी, सहायक फौजदार धर्मराज पाटील, जितेंद्र पाटील, गिरीश पाटील, प्रफुल्ल धांडे व धर्मेंद्र ठाकूर आदींनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलीस आल्याचे समजताच गोंधळ घालणार्‍या पळत सुटले. दगडफेक करणार्‍या तसेच वादाला जबाबदार असलेल्या लोकांना ताब्यात घेण्याची हालचाल सुरु होताच दोन्ही गटाने एकही गट तक्रार देण्यासाठी पुढे आला नाही. कारवाईच्या भीतीने दोन्ही गटाने आपसात वाद मिटवला.त्यामुळे या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Four injured in Asda's whereabouts from girl's raids: Tension prevailed in police, police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.