जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात चौघे निर्दोष

By admin | Published: February 29, 2016 10:01 PM2016-02-29T22:01:50+5:302016-02-29T22:01:50+5:30

जळगाव : वाळुचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडून दिल्याच्या रागातून कुर्‍हाड व हॉकी स्टीकने प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात वडगाव स्वामीचे, ता.पाचोरा येथील चार जणांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

Four innocent people tried to kill him | जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात चौघे निर्दोष

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात चौघे निर्दोष

Next
गाव : वाळुचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडून दिल्याच्या रागातून कुर्‍हाड व हॉकी स्टीकने प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात वडगाव स्वामीचे, ता.पाचोरा येथील चार जणांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
खटल्याची थोडक्यात हकिकत अशी की, वडगाव स्वामीचे येथील सचिन फकिरा पाटील, मानसिंग महिपत पाटील, विजयसिंह झावरू पाटील व प्रदीप शिवाजी पाटील यांच्यावर ९ मे २०१५ रोजी रुपसिंग धोंडू पाटील, अर्जुन नरसिंग पाटील, करणसिंग नरसिंग पाटील व प्रेमसिंग भावसिंग पाटील या चौघांनी कुर्‍हाड व हॉकी स्टीकने प्राणघातक हल्ला केला होता. घटनेच्या महिनाभरापूर्वी अर्जुन पाटील याचे वाळूचे ट्रॅक्टर पाचोरा तहसीलदारांनी पकडले होते. हे ट्रॅक्टर पकडून दिल्याचा राग मनात ठेऊन आरोपींनी हा हल्ला केला होता. या प्रकरणी सचिन पाटीलने दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणार्‍या वरील चौघांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ४४८, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. हा खटला न्या.के.पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात चालला. त्यात साक्षीदारांच्या जबाबातील तफावती, तपासकामातील त्रुटींचा विचार करता न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे ॲड.चारुशीला बोरसे यांनी तर आरोपींतर्फे ॲड.वसंत ढाके, ॲड.भारती ढाके यांनी काम पाहिले.

Web Title: Four innocent people tried to kill him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.