कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; आता घरात ६ आणि ८ वर्षांच्या दोन चिमुकल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 03:56 PM2021-05-10T15:56:32+5:302021-05-10T15:57:27+5:30

देशाता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दररोज जीवघेण्या कहाण्या ऐकायला मिळत आहेत.

four member of family died due to coronavirus in ghaziabad two innocent daughters left lone | कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; आता घरात ६ आणि ८ वर्षांच्या दोन चिमुकल्या!

कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; आता घरात ६ आणि ८ वर्षांच्या दोन चिमुकल्या!

Next

देशाता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दररोज जीवघेण्या कहाण्या ऐकायला मिळत आहेत. गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपब्लिक सोसायटीमधील एका कुटुंबावर कोरोना महामारीचं संकट कोसळलं आणि संपूर्ण कुटुंबच कोरोनामुळे संपुष्टात आलं आहे. घरात आता केवळ दोन चिमुकल्या मुली राहिल्या आहेत. एका हसत्याखेळत्या कुटुंबाची परिस्थिती अवघ्या काही दिवसांमध्ये उद्ध्वस्त झालीय. घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे तर भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं आहे. (four member of family died due to coronavirus in ghaziabad two innocent daughters left lone)

सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार टॉवर-२च्या फ्लॅट क्रमांक २०५ मध्ये दुर्गेश प्रसाद यांचं कुटुंब राहत होते. दुर्गेश प्रसाद निवृत्त प्राध्यापक होते आणि अतिशय चांगले व्यक्ती होते. सामाजिक कामांमध्ये ते नेहमी पुढाकार घेत असत. कोरोनाची लागण झाल्यानंतर दुर्गेश त्यांच्या राहत्या घरीच आयसोलेट झाले होते आणि औषधोपचार सुरू होता. पण दुसऱ्याच दिवशी त्यांची तब्येत बिघडली आणि याच दरम्यान त्यांची पत्नी, मुलगा आणि सुनेलाही कोरोनाची लागण झाली. 

२७ एप्रिल रोजी दुर्गेश यांचं घरीच निधन झालं. त्यानंतर सोसायटीमधील नागरिकांनी उर्वरित तिघांना ग्रेटर नोएडा येथील शारदा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली. तिघांवरही उपचार सुरू होते. पण ४ मे रोजी दुर्गेश यांचा मुलगा अश्विन यांचाही मृत्यू झाला. तर ५ मे रोजी दुर्गेश यांच्या पत्नीचीही प्राणज्योत मालवली. दोन दिवसांनी म्हणजेच ७ मे रोजी दुर्गेश यांच्या सुनेचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांत संपूर्ण कुटुंब कोरोनामुळे संपलं. कुटुंबातील चार मोठे सदस्य कोरोनाच्या विखळण्यात सापडले. आता घरात एक ६ वर्षांची तर दुसरी ८ वर्षांची अशा दोन चिमुकल्या मुली आहेत. दोन्ही चिमुकल्यांवरचं छत्र हरपल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कोरोनामुळे निधन झालेलं असल्यानं चौघांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीच पुढे आलं नाही. अखेर दुर्गेश प्रसाद यांच्या मुलीला सारं कळाल्यानंतर ती गाझियाबादला पोहोचली आणि चौघांवर अंत्यसंस्कार केले. दोन चिमुकल्या मुली सातत्यानं त्यांच्या आई-वडिलांबाबत सोसायटीमधील शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना विचारत आहेत. पण त्या चिमुकल्या दोघींना काय कारण सांगायचं आणि त्यांची विनवणी ऐकूनच सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. 
 

Web Title: four member of family died due to coronavirus in ghaziabad two innocent daughters left lone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.