चार महिन्यांचे रेकॉर्डिंग जप्त
By admin | Published: April 4, 2015 04:27 AM2015-04-04T04:27:06+5:302015-04-04T04:27:06+5:30
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रुममध्ये लावलेला ‘छुपा कॅमेरा’ पकल्यानंतर ‘फॅब इंडिया
पणजी : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रुममध्ये लावलेला ‘छुपा कॅमेरा’ पकल्यानंतर ‘फॅब इंडिया’च्या व्यवस्थापकाच्या कार्यालयातील एका कॉम्प्युटरमध्ये असलेले चार महिन्यांचे रेकॉर्डिंग पोलिसांनी जप्त केले आहे, असे आ. लोबो यांनी सांगितले.
नेमके काय घडले ?
कळंगुट येथे हॉटेलात उतरलेल्या इराणी दुपारी १२.१५च्या सुमारास खरेदीसाठी शोरुममध्ये आल्या. काही कपडे त्यांनी निवडले. तोपर्यंत साधारणपणे १२.४0 वाजले होते. त्या चेंजिंग रुममध्ये गेल्या. इराणी यांच्या साहाय्यकान हा कॅमेरा पाहून त्याविषयीची कल्पना इराणी यांना दिली. त्याचा जाब शोरुममधील व्यवस्थापकाला विचारला. चेंजिंग रुमच्या बाहेरील या कॅमेऱ्याची रचना अशा होती की आतील चित्रीकरणही होत असावे, असा कयास आहे.
आमदार मायकल लोबोे म्हणाले की, सत्ताधारी भाजपा सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतलेले असून कोणालाही दयामाया न दाखवता कडक कारवाई केली जाईल. कॅमेरा संशयास्पद स्थितीत लावण्यात आलेला होता. पोलिसांनी आपल्या उपस्थितीत हार्ड डिस्क जप्त केली आहे. कॅमेऱ्यात तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत महिलांची कपडे बदलतानाची अश्लील छायाचित्रे टिपलेली असावीत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.