पीएनबी घोटाळ्यांत आणखी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:22 AM2018-03-05T06:22:14+5:302018-03-05T06:22:14+5:30
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यात सीबीआयने रविवारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांशी संबंधित आणखी चौघांना अटक केली.
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यात सीबीआयने रविवारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांशी संबंधित आणखी चौघांना अटक केली.
यात मोदी याच्या फायरस्टार कंपनीचे तत्कालीन सहायक महाव्यवस्थापक मनिष बोसामिया व वित्त व्यवस्थापक अनिल पंड्या, तसेच गिली इंडियाचे संचालक ए. शिवरामन नायर यांचा समावेश आहे. याखेरीज मोदी यांच्या कंपन्यांचे लेखापरीक्षण करणाºया मेसर्स संपत अँड मेहता या सीए फर्मचे भागीदार संजय रांभिया यांनाही अटक करण्यात आली. यापैकी बोसामिया व पंड्या यांनी बनावट एलओयूसाठी अर्ज तयार केले होते, तर नायर यांनी त्यावर स्वाक्षºया केल्या होत्या.
६४ कंपन्यांना मालमत्ता विकण्यास मनाई
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ््याशी संबंधित नीरव मोदी, मेहुल चोकसी, तसेच त्यांचे नातेवाईक, अन्य व्यक्ती हे मालक किंवा भागीदार असलेल्या ६४ कंपन्यांना त्यांची मालमत्ता विकण्यास नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने मनाई केली आहे.
त्यामध्ये गीतांजली जेम्स, गिली इंडिया, नक्षत्र ब्रँड्स, फायरस्टार डायमंड, सोलार एक्स्पोर्ट्स, स्टेलार डायमंड आदी कंपन्यांचा समावेश आहे.