भाजपचे आणखी चार, काँग्रेसचे १० उमेदवार निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:24 AM2018-03-12T04:24:01+5:302018-03-12T04:24:01+5:30
भाजपने अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे.पी. नड्डा यांच्यासह ८ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता पक्ष राज्यसभेच्या ५८ जागांसाठी होणाºया निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील यादी तयार करीत आहे. या यादीत महासचिव सरोज पांडे, डॉ. अनिल जैन यांच्यासह प्रवक्ते अनिल बलुनी आणि जीव्हीएल नरसिंह राव यांचे नाव समाविष्ट केले जाऊ शकते.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली - भाजपने अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे.पी. नड्डा यांच्यासह ८ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता पक्ष राज्यसभेच्या ५८ जागांसाठी होणाºया निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील यादी तयार करीत आहे. या यादीत महासचिव सरोज पांडे, डॉ. अनिल जैन यांच्यासह प्रवक्ते अनिल बलुनी आणि जीव्हीएल नरसिंह राव यांचे नाव समाविष्ट केले जाऊ शकते. तथापि, काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय अन्य ९ उमेदवार जाहीर केले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने या चार नेत्यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. याशिवाय अशोक वाजपेयी यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. हरियाणा आणि छत्तीसगडचे प्रभारी महासचिव अनिल जैन हे पक्षातील दिग्गज नेत्यात गणले जातात, तर राजस्थानातून पक्षाने किरोडीलाल मीणा यांना संधी देण्याचे ठरविले आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रीय जनतांत्रिक पार्टीचे विलीनीकरण भाजपत केले आहे. महाराष्ट्राच्या प्रभारी महासचिव सरोज पांडे यांनाही छत्तीसगडच्या एकमेव जागेवरून उमेदवारी दिली जाऊ शकते.
१६ राज्यांत निवडणुका
ज्या जागांवर निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशातील १०, महाराष्ट्र आणि बिहारमधील ६, मध्यप्रदेशातील ५ आणि आंध्र, ओडिशा तथा राजस्थानच्या तीन-तीन जागा आहेत. याशिवाय अन्य काही राज्यांत राज्यसभेच्या जागा रिक्त होत आहेत. राज्यसभेत आपल्या जागा वाढविण्यासोबतच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणिते जुळविली जात आहेत.
७ केंद्रीय मंत्र्यांसह
८ उमेदवारांची घोषणा
भाजपने आतापर्यंत ज्या ८ जणांची नावे जाहीर केली त्यात अर्थमंत्री अरुण जेटलींना उत्तर प्रदेशातून, मध्यप्रदेशातून थावरचंद गेहलोत व धर्मेंद्र प्रधान, गुजरातेतून मनसुखभाई मंडाविया व पुरुषोत्तम रुपाला, आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा हिमाचल प्रदेशातून, बिहारमधून रविशंकर प्रसाद यांना उमेदवार बनविण्यात आले आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात राज्यसभेच्या ज्या जागा रिक्त होणार आहेत त्यांच्यासाठी २३ मार्च रोजी मतदान होईल व २६ मार्चपर्यंत निकाल जाहीर होतील. त्यासाठी १२ मार्चपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. १५ मार्च रोजी अर्ज मागे घेता येईल.
उमेदवारांची नावे
नारायण राणे महाराष्ट्र
व्ही. मुरलीधरन महाराष्ट्र
सरोज पांडे छत्तीसगढ
अनिल बलुनी उत्तराखंड
करोडीलाल मीणा राजस्थान
लेफ्ट. जी.डी.पी. वत्स हरियाणा
अजय प्रताप सिंह मध्य प्रदेश
कैलाश सोनी मध्य प्रदेश
अशोक वाजपेयी उत्तर प्रदेश
विजय पाल सिंह तोमर उत्तर प्रदेश
सकल दीप राजभर उत्तर प्रदेश
कांता करदम उत्तर प्रदेश
डॉ. अनिल जैन उत्तर प्रदेश
जी.व्ही.एल. नरसिंहराव उत्तर प्रदेश
हरनाथसिंह यादव उत्तर प्रदेश
राजीव चंद्रशेखर कर्नाटक
समीर उरोव झारखंड
काँग्रेसचे उमेदवार
कुमार केतकर महाराष्ट्र
नारनभाई राथवा गुजरात
अमी याज्ञिक गुजरात
धीरजप्रसाद साहू झारखंड
डॉ. एल. हनुमंथय्या कर्नाटक
डॉ. सय्यद नासीर हुसेन कर्नाटक
जी. सी. चंद्रशेखर कर्नाटक
राजमानी पटेल मध्य प्रदेश
पोरिका बलराम नायक तेलंगणा
अभिषेक मनू सिंघवी पश्चिम बंगाल