आणखी चार दिवस टोलमाफी !

By admin | Published: November 14, 2016 03:55 PM2016-11-14T15:55:00+5:302016-11-14T18:05:17+5:30

राष्टीय महामार्गांवरील टोलमाफी आणखी चार दिवस वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सामान्य वाहनचालकांना अजून चार दिवस दिलासा मिळाला आहे.

Four more days tollfree! | आणखी चार दिवस टोलमाफी !

आणखी चार दिवस टोलमाफी !

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 - राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी आणखी चार दिवस वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सामान्य वाहनचालकांना अजून चार दिवस दिलासा मिळाला आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशभरातील नागरिकांची एकच तारांबळ उडताना दिसत आहे. तसेच, टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर 14 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आता पुन्हा चार दिवस वाढविला आहे.
 
या निर्णयामुळे आता येत्या 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही टोलवसुवली बंद राहणार आहे. याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केलं आहे.  केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी 18 नोव्हेंबरपर्यंत वाढविल्यानंतर राज्य सरकारच्या अखत्यारीतील महामार्गावर सुद्धा टोलमाफीत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने टोलनाक्यांवरही 18 नोव्हेंबरपर्यंत टोल वसुली बंद केली आहे.  
 

Web Title: Four more days tollfree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.