चार गटांसाठी एकोणीस, तर आठ गणांसाठी चाळीस उमेदवार रिंगणात

By admin | Published: February 13, 2017 07:11 PM2017-02-13T19:11:40+5:302017-02-13T19:11:40+5:30

गटासाठी १५ जणांची, तर गणांसाठी २५ उमेदवारांची माघार

Four nominations for four groups, and forty candidates for eight Ganions | चार गटांसाठी एकोणीस, तर आठ गणांसाठी चाळीस उमेदवार रिंगणात

चार गटांसाठी एकोणीस, तर आठ गणांसाठी चाळीस उमेदवार रिंगणात

Next


नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या सोमवारी (दि.१३) या दिवशी नाशिक तालुक्यातील चार गटांसाठी एकोणीस, तर आठ गणांसाठी चाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी दिली.
माघारीच्या अंतिम दिवशी गटांसाठी १५, तर गणांसाठी २५ उमेदवारांनी माघारी घेतल्या. माघारी घेतलेल्या उमेदवारांमध्ये गिरणारे गटातून संगीता चारस्कर व इंदूबाई बेंडकोळी, पळसे गटातून उपसभापती अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, सविता तुंगार, हरिश्चंद्र बोराडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी माघारी घेतल्या. तर एकलहरे गटासाठी प्रकाश आडके, अतुल धनवटे, मोहन लिंबोळे, तसेच गोवर्धन गटातून वामन हिरामण खोसकर, राहुल गुंबाडे, राजेंद्र चारस्कर, रवींद्र मोंढे, कृष्णा वाघ यांचा अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवारांमध्ये समावेश आहे. पंचायत समितीच्या आठ गणांसाठी देवरगाव गणातून लताबाई उदार, गिरणारे गणातून दीपाली कडाळे, संगीता चारस्कर, सिद्धप्रिंपी गणातून सोनाली कांडेकर, रेखा ढिकले, संगीता ढिकले, सुनंदा पेखळे, पळसे गणातून राणी गायधनी, लीलाबाई गायधनी, सविता तुंगार, प्रियंका धात्रक, एकलहरे गणातून शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, सुरेश घुगे, भाऊसाहेब जगताप, लक्ष्मण ढोमसे, राजू धात्रक, सुनंदा पेखळे, प्रकाश बर्वे, मोहन लिंबोळे, लहवित गणातून मंगला गोडसे, गोवर्धन गणातून तानाजी गडदे, विल्होळी गणातून संपत चुंबळे, भास्कर थोरात, सदानंद नवले आदिंनी माघारी घेतल्या आहेत. सोमवारी सकाळपासूनच शिवसेनेकडून तालुकाप्रमुखांसह बंडखोरांचे मन वळविण्यासाठी फारसे प्रयत्न केले गेले नसल्याचे चित्र होते.

Web Title: Four nominations for four groups, and forty candidates for eight Ganions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.