हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! लग्नाची वरात घेऊन निघालेल्या कारचा अपघात, नवरदेवासह चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 10:02 AM2023-11-06T10:02:59+5:302023-11-06T10:06:53+5:30

लग्नाच्या आनंदाचे क्षणार्धात शोकात रूपांतर झाले. अपघातात नवरदेवासह चौघांचा मृत्यू झाला

four people including groom died who was carrying barat ludhiana moga | हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! लग्नाची वरात घेऊन निघालेल्या कारचा अपघात, नवरदेवासह चौघांचा मृत्यू

फोटो - आजतक

पंजाबमधील मोगा येथे एक भीषण अपघात झाला आहे. नवरदेव आणि इतर लोकांना घेऊन जाणारी कार पार्क केलेल्या ट्रॉलीला धडकली. यामध्ये नवरदेवासह चौघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वर आणि वधू पक्षाच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. लग्नाच्या आनंदाचे क्षणार्धात शोकात रूपांतर झाले. मोगाच्या अजितवालजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुखबिंदर सिंह फाजलिका ते बदोवाल लुधियानाला लग्नाची वरात घेऊन जात होते. कारमध्ये ड्रायव्हरसोबतच नवरा मुलगा, सिमरन कौर, अंग्रेज सिंह आणि चार वर्षांची मुलगी अर्शदीप होती. अजितवालजवळ उभ्या असलेल्या ट्रॉलीवर जाऊन कार धडकली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. 

कार ट्रॉलीला धडकल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर चालक जखमी झाला. त्यांना उपचारासाठी मोगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अपघाताबाबत अजितवाल पोलीस स्टेशनचे एसएचओ म्हणाले की, हा अपघात मोगा लुधियाना रोडवर झाला. कार पार्क केलेल्या ट्रकला धडकली. कारमधील लोक लग्नाच्या वरातीसाठी फाजिल्काहून बडोवाल लुधियानाला जात होते.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'भारतातील रस्ते अपघात-2022' या विषयावर वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, 2022 मध्ये एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले ज्यात 1,68,491 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर 4,43,366 लोक जखमी झाले आहेत. या अहवालानुसार दर तासाला 53 रस्ते अपघात झाले असून दर तासाला 19 जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सीट बेल्ट आणि हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 

Web Title: four people including groom died who was carrying barat ludhiana moga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.