...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं! घराला आग लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:10 PM2021-10-26T12:10:41+5:302021-10-26T12:18:44+5:30
Four person found dead after fire broke out : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होरीलाल हे कुटुंब राहत होतं. पण आगीत त्यांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये मंगळवारी जुनी सीमापुरी भागात एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या भयंकर घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाला पहाटे चार वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि तासाभरात त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र अग्निशमन दलाचे जवान घराच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले असता एका खोलीत कुटुंबातील चारही सदस्य मृतावस्थेत आढळले आहेत. आगीमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होरीलाल हे कुटुंब राहत होतं. पण आगीत त्यांचा मृत्यू झाला आहे. चारही लोक एका छोट्या खोलीत मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये होरीलाल, त्यांची पत्नी रीना, त्यांचा 24 वर्षीय मुलगा आशू आणि 18 वर्षीय मुलगी रोहिणी यांचा समावेश आहे. होरीलाल शास्त्री हे सरकारी कर्मचारी होते आणि मार्च 2022 मध्ये ते निवृत्त होणार होते. तर त्यांची पत्नी एमसीडीमध्ये सफाई कामगार होती. आशू बेरोजगार होता तर रोहिणी सीमापुरी येथील सरकारी शाळेत बारावीमध्ये शिकत होती. त्यांचे मृतदेह हे जीटीबी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
Four person found dead after a fire broke out at top floor of three-storey building in Old Seemapuri area early in the morning: Delhi Police pic.twitter.com/vdmJ7UWlQG
— ANI (@ANI) October 26, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वांचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तर चारही जणांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. रात्री सर्व जण झोपलेले असल्यामुळे घरात आग लागल्याचं समजलं नाही आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे घटनेच्या सखोल चौकशीनंतरच समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.