केडगावात चार दुकाने फोडली धाडसी चोरी : पोलीस चौकीच्या शेजारील घटना
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM2015-07-29T00:42:37+5:302015-07-29T00:42:37+5:30
अहमदनगर : केडगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत रात्री एकाचवेळी चार दुकानांचे शटर उचकटून आतील सामानाची उचकापाचक केली. चोरट्यांनी केडगावच्या मध्यवस्तीत धाडसी चोरी करून २१ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. यामुळे केडगावमधील व्यापार्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
Next
अ मदनगर : केडगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत रात्री एकाचवेळी चार दुकानांचे शटर उचकटून आतील सामानाची उचकापाचक केली. चोरट्यांनी केडगावच्या मध्यवस्तीत धाडसी चोरी करून २१ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. यामुळे केडगावमधील व्यापार्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.केडगाव येथील बालाजी कॉलनी येथे महापालिकेचे भाग्योदय शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. यात पुरुषोत्तम भूकन यांचे किराणा दुकान आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरची पट्टी उचकटून आत प्रवेश केला. आतील काऊंटरमधील सहा हजार ४५० रुपयांची रोकड चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी राजेंद्र शिंगवी यांच्या मेडिकल दुकानात प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करून १४ हजारांची रोकड चोरून नेली. दोन दुकाने फोडल्यानंतर चोरांनी आपला मोर्चा तेथून जवळच असलेल्या नवनाथ विरकर यांच्या नम्रता कलेक्शनच्या कापड दुकानाकडे वळविला. हे दुकानही फोडून १ हजार ६०० रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे ही दुकाने केडगाव पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर आहेत. तरी या चोरांनी धाडस दाखवून ही दुकाने फोडली. केडगाव-शाहूनगर रस्ता वर्दळीचा असतो. तरीही चोरट्यांनी दुकाने फोडण्याचे धाडस दाखवून पोलिसांनाच आव्हान दिले आहे.चोरट्यांनी जाता-जाता केडगाव देवीच्या रोडवरील माळवे ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरी केली. किती ऐवज गेला, याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. केडगाव पोलीस चौकीच्या मागील बाजूस लागून असलेल्या भाग्योदय कॉम्प्लेक्समध्ये चोरी होण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वीच्या चारही चोरींचा तपास लागला नसताना पाचवी धाडसी चोरी झाल्याने व्यापारी धास्तावले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने चोरीचा तपास सुरू केला. कोतवाली पोलीस ठाण्यात या चोर्यांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)----------------चोरटे कॅमेर्यात कैदचोरट्यांनी भाग्योदय कॉम्प्लेक्समध्ये धाडस दाखविले खरे पण तेथील सचिन ज्वेलर्सच्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. दोन चोरट्यांचे चेहरे यात स्पष्ट दिसत आहेत. फुटेजमध्ये पावणेदोन वाजता ही चोरी झाल्याचे चित्रण आहे.----