पश्चिम बंगाल वगळता चार राज्यांमध्ये सत्तांतराचे संकेत

By admin | Published: May 17, 2016 05:15 AM2016-05-17T05:15:23+5:302016-05-17T05:15:23+5:30

विधानसभा निवडणुकांमधील मतदानाचा अंक सोमवारी पार पडताच मतदानोत्तर सर्वेक्षणाचा (एक्झिट पोल) अंदाज बाहेर आला आहे

Four states except West Bengal signify power of power | पश्चिम बंगाल वगळता चार राज्यांमध्ये सत्तांतराचे संकेत

पश्चिम बंगाल वगळता चार राज्यांमध्ये सत्तांतराचे संकेत

Next


हरीश गुप्ता,

नवी दिल्ली-संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधानसभा निवडणुकांमधील मतदानाचा अंक सोमवारी पार पडताच मतदानोत्तर सर्वेक्षणाचा (एक्झिट पोल) अंदाज बाहेर आला आहे. विविध सर्वेक्षण संस्था आणि टीव्ही वाहिन्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार आसाममध्ये पहिल्यांदाच कमळ फुलणार असून, ममता बॅनर्जी प. बंगालचा गड कायम राखणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तामिळनाडूत जयललिता यांची सत्ता उलथवत द्रमुक-काँग्रेसची युती सत्तेवर येऊ शकते. काँग्रेसला या राज्यासोबतच पुडुच्चेरीमध्येही दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये मात्र या पक्षाला सत्ता गमवावी लागेल. माकपच्या नेतृत्वातील डावी आघाडी तेथे बाजी मारेल.
दिल्ली आणि बिहारमध्ये पानिपत अनुभवणाऱ्या भाजपावर अखेर देव प्रसन्न झाल्याचे आसाममधील मोठ्या विजयाने दिसून येईल. अमित शहा यांच्या नेतृत्वात या पक्षाला पराभवाचे लागोपाठ हादरे बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा-अरुण जेटली या त्रयींसाठी आसाममधील विजय हा मोठी शक्ती देणारा ठरेल. पहिल्यांदा हेमंत विश्व सरमा यांना आपल्या दावणीला आणत आणि नंतर आगप आणि बीपीएफशी आघाडी करीत या पक्षाने विजयासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. ‘वीक विकेट’ बनलेल्या काँग्रेसला १५ वर्षांनंतर या राज्यातील सत्ता गमवावी लागेल. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना मुक्तपणे निर्णय घेण्याला वाव देण्याचे धाडसही काँग्रेसच्या नेतृत्वाला दाखवता आले नाही.
>अंदाज खरे ठरल्यास भाजपाला फायदा
डाव्यांसोबत आघाडी करणाऱ्या काँग्रेसला प. बंगालमध्ये दुसरा हादरा बसणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडेच सत्ता राहणार, याबाबत सर्वच एक्झिट पोलमध्ये एकवाक्यता दिसून येत आहे.
एका वाहिनीने तृणमूलला २९४पैकी १६३ तर दुसऱ्या पोलस्टरने या पक्षाच्या झोळीत चक्क २५३ जागा टाकल्या आहेत. तसे घडल्यास डावे-काँग्रेस आघाडीच्या वाट्याला मानहानीजनक पराभव आलेला असेल.
माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासाठीही हा पराभव अडचणीचा ठरू शकतो. त्यांना केरळचाच काय तो दिलासा मिळेल; मात्र या राज्यात तीन सर्वेक्षण संस्थांनी डाव्या आघाडीचा निसटता विजय तर एकाने पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफच्या हाती सोपविली आहे. अंदाज खरे ठरले तर भाजपाच्या पदरी लाभच पडलेला असेल.
>दोन पक्षांची मोट कायम राहण्याची शक्यता
पुडुच्चेरीतील विजय आणि तामिळनाडूतील द्रमुकसोबतची भागीदारी ही काँग्रेससाठी आनंदाची बाब मानली जाईल. केरळमधील विजय डाव्या आघाडीच्या पथ्यावर पडेल.
२०११मध्ये प. बंगालमध्ये पराभूत होऊनही या पक्षाने काँग्रेससोबत आघाडीचा प्रयोग कायम ठेवला. या वेळीही त्यात अपयश आले तरी येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत या दोन पक्षांची मोट कायम राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

Web Title: Four states except West Bengal signify power of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.