परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीत उडी अन्...; एकाला वाचवताना ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:35 PM2024-02-29T12:35:53+5:302024-02-29T12:38:09+5:30
परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीवर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडली.
परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीवर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडली. येथे चार मुलांनी शाळेजवळील नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना कर्नाटकातील मंगळुरू परिसरात घडली. विशेष बाब म्हणजे अनेक दिवसांनंतर ही बाब उघडकीस आली. स्थानिक पोलिसांनी पाण्यावर तरंगत असलेले मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून यशवित चंद्रकांत, निरूप, अनवित आणि राघवेंद्र अशी त्यांची नावं आहेत. या सर्वांचं वय १५ ते १६ वर्ष आहे. स्थानिक सुरतकल पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. मृत विद्यार्थी एसएसएलसीची प्राथमिक परीक्षा दिल्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
एकाला वाचवताना चौघांचा मृत्यू
परीक्षा संपल्यानंतर हे विद्यार्थी परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी नदीत पोहायला गेले होते, मात्र ते सर्वजण नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना असा संशय आहे की, विद्यार्थ्यांनी पोहण्यासाठी नदी गाठली पण आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. एका विद्यार्थ्याचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य तीन जणही बुडाले असावेत, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी सुरतकल येथील खासगी शाळेत शिकत होते. परीक्षा देऊन शाळेच्या आवारातून बाहेर पडलेले हे चार विद्यार्थी आपापल्या घरी न परतल्याने त्यांच्या चिंतेत असलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यानंतर शोध सुरू असताना हेलियांगडीजवळील नदीत चार विद्यार्थ्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले.