हैदराबाद विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांचे निलंबन मागे
By admin | Published: January 21, 2016 04:46 PM2016-01-21T16:46:19+5:302016-01-21T17:29:03+5:30
हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येवरून देशात रणकंदन सुरु झाल्यानंतर हैदराबाद विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबागद, दि. २१ - हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येवरून देशात रणकंदन सुरु झाल्यानंतर हैदराबाद विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. हैदराबाद विद्यापीठाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या चार दिवसांपूर्वी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. रोहितच्या आत्महत्येनंतर विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी निदर्शने केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. आॅगस्ट २०१५ मध्ये विद्यापीठात ‘मुझफ्फरनगर बाकी है’ या वृत्तचित्र प्रदर्शनावरून दलित विद्यार्थी संघटना आणि अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे रोहित आणि अन्य पाच दलित विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. अभाविपच्या नेत्यावर हल्ला केल्याचा या सर्वांवर आरोप होता. या घटनेनंतर रोहित तणावाखाली होता. त्याला गेल्या सहा महिन्यांपासून शिष्यवृत्ती मिळत नव्हती असा आरोप निदर्शने करणा-या विद्यार्थ्यांनी केला होता.
दरम्यान, निलंबन मागे घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव पोडिले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याच्या हैदराबाद विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.