चौधरी चरण सिंह यांच्यासह चार दिग्गजांना 'भारतरत्न' प्रदान, आडवाणी यांना घरी जाऊन सन्मानित करणार राष्ट्रपती मुर्मू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 12:41 PM2024-03-30T12:41:32+5:302024-03-30T12:42:37+5:30
महत्वाचे म्हणजे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यावेळी पाच दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यानंतर, महामना मालवीय, पंडित अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव कर्पूरी ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न देण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना या सन्मानाने सन्मानित कणार आहेत.
महत्वाचे म्हणजे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यावेळी पाच दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यानंतर, महामना मालवीय, पंडित अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 53 जणांना भारतरत्न देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारीला लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. आता आडवाणी 96 वर्षांचे आहेत आणि ते आजारीही असतात. यामुळे राष्ट्रपती दौपदी मुर्मू 31 मार्चला त्यांच्या निवासस्तानी जाऊन त्यांना भारतरत्नने सन्मानित करतील. अटल बिहारी वाजपेयी आणि नानजी देशमुख यांच्यानंतर आडवाणी असे तिसरे आरएसएसशी संबंधित नेते आहेत, ज्यांना भारतरत्न देण्यात येत आहे.
महत्वाचे म्हणजे, पीव्ही नरसिंह राव हे देशाचे नववे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळातच देशाने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि भारताची अर्थव्यवस्था संपूर्ण जगासाठी खुली करण्यात आली. यामुळे त्याला नव्या युगाचे प्रवर्तक म्हटले जाते. चौधरी चरणसिंग हे देशाचे पाचवे पंतप्रधान होते. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ते ओळखले जातात. तसेच, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना जननायक म्हणून ओळखले जाते. ते दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. साधी राहणी आणि उच्च विचार यांमुळे आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.