Birth Certificate साठी लाच दिली नाही म्हणून अधिकाऱ्यानं 4 वर्षांच्या मुलाचं वय लिहिलं 104 वर्षे...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:58 PM2020-01-21T15:58:13+5:302020-01-21T16:10:31+5:30
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
बरेली : कथितरित्या लाच दिली नाही म्हणून चार वर्षांच्या मुलाच्या आणि त्याच्या भावाच्या जन्म दाखल्यावर (Birth Certificate) त्यांचे वय 100 वर्षांनी वाढविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्याविरोधात बरेली कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
शाहजहांपूरमधील बेलागावचे पवनकुमार यांनी दोन महिन्यापूर्वी आपले भाचे शुभ (4 वर्षे) आणि संकेत (2 वर्षे) यांचा जन्म दाखला तयार करण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. ग्राम विकास अधिकारी सुशील चंद्र अग्निहोत्री आणि सरपंच प्रवीण मित्र यांनी अर्जदाराकडून जन्म दाखला तयार करण्यासाठी 1000 रुपयांची लाच मागितली.
फिर्यादी पवनकुमार यांनी लाच देण्यास नकार दिला. त्यानंतर सुशील चंद्र अग्निहोत्री आणि प्रवीण मिश्र यांनी जन्म दाखल्यावर घोळ घातला, असे फिर्यादी पक्षाचे वकील राजीव सक्सेना यांनी मंगळवारी सांगितले. याचबरोबर, या दोन्ही मुलांचा जन्म दाखला तयार करण्यात आला. मात्र, त्यावर शुभ यांची जन्म तारीख 13 जून 2016 च्या ऐवजी 13 जून 1916 लिहिली. तर संकेतची जन्म तारीख 6 जानेवारी 2018 च्या ऐवजी 6 जानेवारी 1918 असे लिहिले, असे राजीव सक्सेना यांनी सांगितले.
या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे पवनकुमार यांनी बरेली कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने सुशील चंद्र अग्निहोत्री आणि प्रवीण मिश्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत पोलिसांना याप्रकरणाचा तपास करण्यास सांगितल्याचे राजीव सक्सेना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह
'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले
तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नाही, मोदी सरकारचा खुलासा
Delhi Election : ...म्हणून केजरीवालांना दाखल करता आला नाही उमेदवारी अर्ज
Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप
आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग