चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर नोंदला बलात्काराचा गुन्हा, पीडित मुलगीही त्याच वयाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 04:09 AM2017-11-24T04:09:32+5:302017-11-24T04:09:57+5:30
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील एका प्रतिष्ठित खासगी शाळेत शिकणा-या चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) व भारतीय दंड विधानानुसार बलात्काराचा गुन्हा नोंदल्याने शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील एका प्रतिष्ठित खासगी शाळेत शिकणा-या चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) व भारतीय दंड विधानानुसार बलात्काराचा गुन्हा नोंदल्याने शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या विद्यार्थ्याने जिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे ती पीडित मुलगीही साडेचार वर्षांची असून त्याच्याच वर्गात शिकणारी आहे. पीडित मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला खरा, पण आरोपीचे एवढे लहान वय बघता या प्रकरणाची कायदेशीर हाताळणी नेमकी कशी करायची, याविषयी ते संभ्रमात पडले आहेत. आम्ही हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत असून कायदेशीर सल्ला घेत आहोत, असे दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
पोलिसांनी या विद्यार्थ्याला खरंच अटक केली तर केवळ ‘पॉक्सो’ कायद्याखालचाच नव्हे तर बलात्काराच्या गुन्ह्यातील देशातील तो सर्वात लहान वयाचा आरोपी ठरेल. दंड प्रक्रिया संहितेत सात वर्षांपर्यंतच्या मुलांना गुन्ह्यांच्या बाबतीत विशेष संरक्षण आहे. या प्रकरणात ते कसे व कितपत लागू होते याची पोलीस तपासणी करीत आहेत.
मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीनुसार लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार गेल्या शुक्रवारी शाळेत घडला. आरोपी विद्यार्थ्याने आधी वर्गात आणि नंतर वॉशरूममध्ये त्याच्यासोबत शिकणाºया या मुलीची पॅन्ट काढून तिच्या गुप्तांगात टोक केलेली शिसपेन्सिल व बोट घुसविले, असा आरोप आहे.
>तरतूद भेदभावाची
या प्रकरणाचा विचार करता फौजदारी कायद्यांमधील तरतुदी पुरुष आणि स्त्री यांना भेदभावाची वागणूक देणारी आहे, असे जाणवते. लज्जा हे स्त्रीचे जन्मजात व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे मुलगी वयाने कितीही लहान असली तरी तिचा विनयभंग होतो, असे कायदा मानतो. मुलाच्या बाबतीत मात्र हे लागू नाही. एवढ्या लहान मुलाने ही कृती केली खरी पण ती करताना त्याच्या मनात लैंगिक भावना नव्हती, असा बचाव कायद्यापुढे टिकू शकत नाही.