माजी नगरसेविकेच्या मुलासह चार तरुणांना बेदम मारहाण कासमवाडीतील घटना : ३० ते ४० जणांनी केली मारहाण

By admin | Published: March 5, 2016 11:48 PM2016-03-05T23:48:28+5:302016-03-05T23:48:28+5:30

जळगाव: माजी नगरसेविका आशा शांताराम सूर्यवंशी यांचा मुलगा हर्षल, त्याचे मित्र तुषार राजेंद्र लोहार, श्याम ज्ञानेश्वर माहेरकर व विजय अरविंद सोनार (सर्व रा.रचना कॉलनी) या चार तरुणांना ३० ते ४० जणांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराद कासमवाडीत बेदम मारहाण केली. चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीचे कारण चौघांनीही सांगितले नाही, त्यामुळे घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

Four youths, including a former corporator's son, have been assaulted by a group of 30 to 40 people. | माजी नगरसेविकेच्या मुलासह चार तरुणांना बेदम मारहाण कासमवाडीतील घटना : ३० ते ४० जणांनी केली मारहाण

माजी नगरसेविकेच्या मुलासह चार तरुणांना बेदम मारहाण कासमवाडीतील घटना : ३० ते ४० जणांनी केली मारहाण

Next
गाव: माजी नगरसेविका आशा शांताराम सूर्यवंशी यांचा मुलगा हर्षल, त्याचे मित्र तुषार राजेंद्र लोहार, श्याम ज्ञानेश्वर माहेरकर व विजय अरविंद सोनार (सर्व रा.रचना कॉलनी) या चार तरुणांना ३० ते ४० जणांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराद कासमवाडीत बेदम मारहाण केली. चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीचे कारण चौघांनीही सांगितले नाही, त्यामुळे घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
हर्षल सूर्यवंशी हा बाहेती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी दुपारी तो त्याचे मित्र हे महाविद्यालयातून कासमवाडीत आले असता तांबापुरा, सालार नगर व मास्टर कॉलनीतील ३० ते ४० तरुण हातात लाठ्याकाठ्या व फायटर घेऊन आले व चौघांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी रचना कॉलनीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मारहाण करणार्‍या तरुणांच्या समाजातील काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. जखमी झालेल्या या तरुणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन वेळा पोलीस परत
कासमवाडीत मारहाणीमुळे तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांनी उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, रामकृष्ण पाटील, रत्नाकर झांबरे यांच्यासह कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाठविले. मात्र मारहाण करणारे तेथून गायब झाले होते तर जखमी जिल्हा रुग्णालयात असल्याचे समजल्याने पोलीस तेथे पोहचले. जखमींना कारण विचारले असता एकानेही कारण सांगितले नाही. त्यानंतर दुसर्‍यांदा पुन्हा पोलीस जबाब घेण्यासाठी आले असता तेव्हाही त्यांनी जबाब दिला नाही, त्यामुळे पोलिसांना परत जावे लागले.
अदखलपात्र गुन्‘ाची नोंद
जखमी तरुण जबाब द्यायला तयार नसल्याने धारबळे यांनी त्यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर श्याम माहेरकर या तरुणाने बाबु पिंजारी व त्याच्या तीन साथीदारांनी काहीही कारण नसताना मारहाण केल्याचे सांगितले. त्यावरून अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, उपमहापौर सुनील महाजन, हर्षलचे वडील शांताराम सूर्यवंशी,नगरसेवक चेतन शिरसाळे व संजय कोल्हे आदींनी जिल्हा रुग्णालय गाठून जखमींची भेट घेतली.

Web Title: Four youths, including a former corporator's son, have been assaulted by a group of 30 to 40 people.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.