चौपटीने वाढली लोकसभा निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या; २०१९ च्या निवडणुकीत किती होते उमेदवार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 05:22 AM2024-03-10T05:22:03+5:302024-03-10T05:22:37+5:30

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात १९५२ मध्ये पहिली लाेकसभा निवडणूक झाली. त्यावेळी १,८७४ उमेदवार रिंगणात हाेते.

fourfold increase in number of candidates contesting lok sabha elections | चौपटीने वाढली लोकसभा निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या; २०१९ च्या निवडणुकीत किती होते उमेदवार? 

चौपटीने वाढली लोकसभा निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या; २०१९ च्या निवडणुकीत किती होते उमेदवार? 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : येत्या काही दिवसांमध्ये लाेकसभा निवडणुकीची घाेषणा हाेण्याची शक्यता आहे. साधारणत: एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण हाेण्याचा अंदाज आहे. लाेकसभेच्या रिंगणात हजाराे उमेदवार उतरतात. त्यात विविध राजकीय पक्षांशिवाय अपक्ष उमेदवारांचीही संख्या माेठी असते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात १९५२ मध्ये पहिली लाेकसभा निवडणूक झाली. त्यावेळी १,८७४ उमेदवार रिंगणात हाेते. तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ८,०३९ उमेदवार हाेते. ही संख्या जवळपास साडेचार पटींनी वाढली आहे.

१९५२ पहिली लाेकसभा निवडणूक

४८९ मतदारसंघ, ४.६७ सरासरी उमेदवार, एका मतदारसंघात १७.३ काेटी मतदार 

२०१९ची निवडणूक

५४३ मतदारसंघ १४.८ सरासरी उमेदवार प्रत्येक मतदारसंघात ९६.४ काेटी मतदार

- १३,९५२ एवढे सर्वाधिक उमेदवार १९९६च्या निवडणुकीत हाेते.

- १०,००० रुपये एवढी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून वाढविल्यानंतर १९९९ मध्ये उमेदवारांची संख्या घटली.

- १८५ एवढे सर्वाधिक उमेदवार तेलंगणातील निझामाबाद मतदारसंघात गेल्या निवडणुकीत हाेते.

- ४३५ उमेदवार भाजपने २०१९च्या निवडणुकीत उतरविले हाेते.

- ४२० उमेदवार काॅंग्रेसने गेल्या निवडणुकीत उतरविले हाेते.

- ३७३ ठिकाणी भाजप आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत हाेती.
 

Web Title: fourfold increase in number of candidates contesting lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.