राज्यातील चौघांना ललित कला अकादमी पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 05:14 AM2019-03-24T05:14:50+5:302019-03-24T05:15:02+5:30
ललित कला अकादमीच्या ६० व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील १५ कलावंतांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, सचिन चौधरी, डगलस जॉन, जीतेंद्र सुतार यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : ललित कला अकादमीच्या ६० व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील १५ कलावंतांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, सचिन चौधरी, डगलस जॉन, जीतेंद्र सुतार यांचा समावेश आहे.
या पुरस्कारांचे वितरण मुंबईत होणार आहे. ललित कला अकादमी हे प्रतिभावंत कलाकार व कलांचा गौरव करणारे व त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारे व्यासपीठही आहे. कला मेळ्यातील प्रदर्शनासाठी कलाकृतींची निवड करणाऱ्या समितीत, तज्ज्ञ, समीक्षक व ज्येष्ठ कलावंतांचा समावेश होता. भगवान चव्हाण, जयप्रकाश जगताप, जयंत गजेरा, किशोर ठाकूर, मदन लाल, मनीषा राजू व ओपी खरे यांनी कलाकृतींची निवड केली आहे.
दिग्गजांच्या कलाकृती...
प्रदर्शनात राम सुतार, जी.एस. गायतोंडे, अकबर पदमसी, तैयब मेहता, के. एच. आरा, जहांगीर सबावाला, लक्ष्मण पैर, बी. प्रभा, कृष्णा रेड्डी, प्रफुल्ला डहाणूकर, गोपाळ आडिवरेकर व बी. विठ्ठल या कलावंतांच्या कलाकृती ठेवल्या जातील. हे प्रदर्शन, २४ मार्च ते ८ एप्रिल या काळात सुरू राहणार आहे.