चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांची सभा
By Admin | Published: January 24, 2016 10:20 PM2016-01-24T22:20:26+5:302016-01-24T22:20:26+5:30
चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांची सभा
च ुर्थ श्रेणी कर्मचार्यांची सभाजळगाव- महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कृषी कर्मचार्यांची प्रशासकीय इमारतीच्या आवारात सभा झाली. अध्यक्ष मधुकर सोनवणे, बंडू सोनार उपस्थित होते. सभेत कर्मचार्यांच्या दैनंदिन अडचणी व समस्यांवर चर्चा झाली. रात्रपाळीचे कर्तव्य बजावणार्या कर्मचार्यांना पुरेशा संरक्षणाची तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांनी मागणी केली. तसेच कामाचे तास १६ वरून ८ तास करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी कोषाध्यक्ष अनिल पवार, ज्ञानेश्वर पाटील, किशोर मैराळे उपस्थित होते.स्काऊट-गाईडचा २८ रोजी जिल्हा मेळावाजळगाव- शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरुड विद्यालयात २८ ते ३१ जानेवारी दरम्यान ८ वा स्काऊट/गाईड जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २९ रोजी सकाळी साडे नऊ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ३० रोजी हस्तकौशल्य प्रदर्शन तसेच शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ रोजी समारोप व बक्षीस वितरण समारंभ होईल. उपस्थितीचे आवाहन जिल्हा आयुक्त जयश्री पाटील, बी.जी.मांडवणे यांनी केले आहे.युवा नेतृत्त्व शिबिरजळगाव- नेहरू युवा केंद्र व तुळजाई बहुउद्देशीय संस्था मेहरूण यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरुण येथील बी.एड.कॉलेज परिसरात युवा नेतृत्त्व समुदाय विकास या विषयावर शिबिर घेण्यात आले. केंद्राचे समन्वयक अतुल निकम, सुनील पंजे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संभाजी राजे महाविद्यालयाचे प्राचार्य दीपाली पाटील, प्रा.विश्वनाथ महाजन, किशोर गुंजाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.