बिहार निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान
By Admin | Published: November 1, 2015 11:59 PM2015-11-01T23:59:50+5:302015-11-01T23:59:50+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्याच्या सात जिल्ह्यांमधील एकूण ५५ विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी ५७.५९ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्याच्या सात जिल्ह्यांमधील एकूण ५५ विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी ५७.५९ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिम चंपारणमध्ये ५९.१७ टक्के, पूर्व चंपारणमध्ये ५९.९६ टक्के, शिवहरमध्ये ५६.०५ टक्के, सीतामढीत ५६.०९ टक्के, मुजफ्फरपूर येथे ५६.८३ टक्के, गोपालगंज येथे ५८.९० टक्के आणि सीवान येथे ५४.३१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती अपर मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी दिली. ज्या ५५ विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडले त्यात १२ मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत.