कडेकोट बंदोबस्तात पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू
By admin | Published: April 25, 2016 09:03 AM2016-04-25T09:03:32+5:302016-04-25T09:06:57+5:30
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ४९ जागांसाठी मतदानास सोमवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात सुरूवात झाली.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २५ - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ४९ जागांसाठी मतदानास सोमवारी सकाळी सुरूवात झाली. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार व हिंसाचार घडू नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सकाळी ७ वाजता मतदानास सुरवात झाली खरी मात्र ब-याच ठिकाणी ईव्हीएम मशीन्समधील बिघाडामुळे मतदान सुरू होण्यास विलंबही झाला.
उत्तरी २४ परगणा, विधाननगर आणि हावडा जिल्ह्यातील ४९ जागांसाठी होणा-या मतदानासाठी १२,५०० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. आज एकूण १ कोटी ८ लाख १६ हजार ९४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये ५२ लाख २४ हजार ३९५ महिलांचाही समावेश आहे.
चौथ्या टप्प्यातील या मतदानात अमित मित्रा, पुर्णेन्दु बासू, चंद्रिमा भट्टाचार्य, ब्रत्य बासू, ज्योतिप्रिय मलिक आणि अरूप राय यांच्यासारख्या तृणमूलच्या अनेक नेत्यांच्या तसचे भाजपाच्या रूपा गांगुली, माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला, काँग्रेस नेते अरूणावा घोष यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे.
Voting underway for 4th phase of #WestBengal election, people cast their votes at a polling booth in Howrah pic.twitter.com/3ZuekCiXu7
— ANI (@ANI_news) April 25, 2016
Voting at a polling stn in Salt Lake,WB delayed over 30mins due to technical prob in EVMs,long queues outside booth pic.twitter.com/6zxLUOsB7U
— ANI (@ANI_news) April 25, 2016
Standing here since 6am in morn,polling didn't start at 7am.Now it has begun but one of EVMs still not working-Voter pic.twitter.com/MfGuxMJkBx
— ANI (@ANI_news) April 25, 2016