फ्रान्सचा भारताला NSG च्या सदस्यत्वासाठी पाठिंबा
By admin | Published: June 22, 2016 07:48 PM2016-06-22T19:48:28+5:302016-06-22T20:11:19+5:30
भारताला आण्विक पुरवठादार समूहाच्या (NSG) सदस्यत्वाला फ्रान्सने पाठिंबा दर्शविला आहे. उद्या सेऊलमध्ये होणा-या ४८ देशांच्या बैठकीत आण्विक पुरवठादार
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - भारताला आण्विक पुरवठादार समूहाच्या (NSG) सदस्यत्वाला फ्रान्सने पाठिंबा दर्शविला आहे.
उद्या सेऊलमध्ये होणा-या ४८ देशांच्या बैठकीत आण्विक पुरवठादार समूहाचे सदस्यत्व असलेल्या इतर देशांना भारताला समर्थन देण्यासाठी फ्रान्स आवाहन करणार असल्याचे, फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
भारताच्या आण्विक पुरवठादार समूहाच्या (NSG) सदस्यत्वाला चीनने विरोध केला असून हा विरोधाला मोडून काढण्यासाठी भारताने इतर देशांना यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.