भारतीय कृषी विद्यालयात स्नेहसंमेलन

By Admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:18+5:302017-01-31T02:06:18+5:30

Fraternity of Indian Agricultural School | भारतीय कृषी विद्यालयात स्नेहसंमेलन

भारतीय कृषी विद्यालयात स्नेहसंमेलन

googlenewsNext
>भारतीय कृषी विद्यालयात स्नेहसंमेलन
नागपूर : भारतीय कृषी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि भारतीय आदर्श प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सचिव राकेश पन्नासे, लिलाधर डाफ, प्राचार्य पवार, कान्हेरे, पेंदाम, अर्चना पन्नासे उपस्थित होत्या.
.......
अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
नागपूर : अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाच्यावतीने अलीकडेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनानिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. देवेंद्र मोहतुरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची सविस्तर माहिती दिली. तसेच गं्रथालयातील पुस्तकांचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन केले.
.......
मोहाडी येथे ग्रामीण शिबिर
नागपूर : नागरिक शिक्षण मंडळाद्वारे संचालित भैयाजी पांढरीपांडे नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ सोशल वर्क, या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनातर्फे नागपूर जिल्ह्यातील मोहाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा परिसरात ग्रामीण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार सुधीर पारवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल. एस. तुळणकर होते. तर अतिथी म्हणून शिवाजीराव सोनसरे उपस्थित होते.
........
इंदिरा गांधी हायस्कूलतर्फे स्नेहसंमेलन
नागपूर : जुना सभेदार ले-आऊट येथील इंदिरा गांधी हायस्कूलच्यावतीने स्नेहसंमेलन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रवि भेलोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाल लांजेवार होते. अतिथी म्हणून डॉ. संदीप आकरे, मालती विंचूरकर, सुरेश धावडे, अल्का पेठे, अनिता हजारे उपस्थित होत्या. यावेळी मागील वर्षीच्या इयत्ता दहावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान बालवाडी आणि बालमंदिर तसेच बालाजी कॉन्व्हेटच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Web Title: Fraternity of Indian Agricultural School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.