Fraud: पत्नीला कर्मचारी दाखवून १० वर्षे लाटला पगार, कंपनीला कोट्यवधीचा गंडा, असं फुटलं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 01:32 PM2023-08-01T13:32:12+5:302023-08-01T13:33:49+5:30
Crime News: आर्थिक अफरातफरीचा एक धक्कादायक प्रकार राजधानीतून समोर आला आहे. येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने फसवणूक करून आपली पत्नीही कंपनीमध्ये कर्मचारी असल्याचे दाखवले आणि तिच्या नावावर पगार सुरू केला.
आर्थिक अफरातफरीचा एक धक्कादायक प्रकार राजधानीतून समोर आला आहे. येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने फसवणूक करून आपली पत्नीही कंपनीमध्ये कर्मचारी असल्याचे दाखवले आणि तिच्या नावावर पगार सुरू केला. सुमारे दहा वर्षे हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू होता. कंपनीच्या रेकॉर्डमध्ये अफरातफर करून तिथे पत्नीचं नाव जोडून तो तिच्या खात्यामध्ये परागाची रक्कम पाठवत होता. २०१२ नंतर त्याने पत्नीच्या बँक खात्यामध्ये तब्बल ३.६ कोटी रुपये ट्रान्सफर केले. कर्मचाऱ्याने स्वत:चंही वेतन वाढवलेलं दाखवून ६० लाख रुपये अधिक पाठवले. त्यामुळे कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाली.
हा धक्कादायक प्रकार मॅनपॉवरग्रुप सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे. जी विविध कंपन्यांना कर्मचारी आणि भरती सेवा प्रदान करते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मॅनपॉवरग्रुपच्या तक्रारीनुसार राधाबल्लभ नाथ याने २००८ मध्ये सहव्यवस्थापक (वित्त) या पदावरून कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला पदोन्नत्ती मिळून तो कंपनीमध्ये व्यवस्थापक (वित्त) बनला. नाथ याने कथितपणे कंपनीची फसवणूक करून त्याच्या बेरोजगार पत्नीला उत्पन्नाचा नियमित स्त्रोत तयार करण्याची योजना आखली. कंपनी डेटा गोपनीय ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य देत असल्यावे संचालक (मनुष्यबळ), मुख्य मनुष्यबळ अधिकारी (सीएचआरओ) आणि नाथ यांना मासिक वेतन आणि इतर डेटा मिळू शकत होता.
नाथ बाहेरील वेतन व्हेंडर आणि मनुष्यबळ, वित्त यासारख्या कंपनीच्या इतर विभागांमधील एक दुवा होता. तो मासिक वेतनाचा भरणा करण्यासाठी रजिस्टर तयार करण्यासाठी नव्या भरती झालेले कर्मचारी, कंपनी सोडून गेलेले लोक आणि सध्याचे कर्मचारी यांच्या हजेरीसंबंधीचा तपशील वेतन व्हेंडरला पाठवला होता. व्हेंडर मासिक भरण्याचं रजिस्टर तयार करून नाथ यांच्याकडे पाठवायचा. तो तिथून हा तपशील मनुष्य बळ विभागाच्या संचालकांकडे पाठवायचा.
त्यानंतर रजिस्टर अंतिम मंजुरीसाठी मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी (सीएसआरओ) यांना पाठवायचा. सीएचआरओ त्याला मान्यता द्यायची. तसेच त्याला संचालक (मनुष्यबळ विकास) यांच्याकडे परत पाठवायची. ते अंतिम वेतन रजिस्टरच्या रूपात नाथ यांच्याकडे द्यायचं होतं. वेतन जारी करण्यासाठी अंतिम वेतन रजिस्टर बँकेला पाठवण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. मात्र हे रजिस्टर बँकेकडे पाठवण्यापूर्वी नाथ त्याच्यामध्ये अफरातफर करून पत्नीचं नाव जोडायचा.
कंपनीनं तक्रारीत म्हटलं आहे की, राधावल्लभ नाथ याला ११ डिसेंबर २०२२ रोजी निलंबित करण्यात आलं होतं. तत्पूर्वी ८ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत समोर आलेल्या विसंगतींबाबत चौकशीसाठी नाथला बोलावण्यात आलं होतं. तिथे कागदपत्रे पाहिल्यावर नाथ याने आपण २०१२ पासून आपल्या पत्नीच्या बँक खात्यामध्ये अवैधपणे ३.६ कोटी रुपये जमा केल्याचे मान्य केले, असेही तक्रारीत म्हटले आहे.