कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक ; ४३ जणांवर गुन्हा
By admin | Published: August 3, 2015 10:31 PM2015-08-03T22:31:26+5:302015-08-03T22:31:26+5:30
तळेगाव दाभाडे : धामणे ( ता. मावळ,जि.पुणे) येथील एआरके इंडस्ट्रीज या कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील ४३ जणांवर येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे संचालक अरविंद विश्वेश्वरनाथ आगरवाल ( वय ५५, रा. मुकुंद टॉवर, शीतलनगर, मीरा रोड, ठाणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
Next
त ेगाव दाभाडे : धामणे ( ता. मावळ,जि.पुणे) येथील एआरके इंडस्ट्रीज या कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील ४३ जणांवर येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे संचालक अरविंद विश्वेश्वरनाथ आगरवाल ( वय ५५, रा. मुकुंद टॉवर, शीतलनगर, मीरा रोड, ठाणे ) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, कंपनीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने कटकारस्थान करून २ एप्रिल २०१० ते २९ मे २०१५ या कालावधीत कंपनीस स्टील शिटचा माल देण्यास भाग पाडले व बिलात ठरलेल्या दिवसांची मुदत संपल्यानंतरदेखील कंपनीस देय असलेली ३ कोटी ४४ लाख ८१ हजार १७० रुपये बिलाची रक्कम दिली नाही. या संदर्भात ४३ जणांवर कलम ४२०, ४०६ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. -----