बनावट कस्टमर केअर नंबर्सवर आळा घालणार, सरकार अॅक्शन मोडमध्ये; जाणून घ्या काय आहे प्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 09:27 AM2022-10-22T09:27:52+5:302022-10-22T09:33:57+5:30
Fraud Customer Care Numbers : अनेकवेळा ग्राहक आपली तक्रार नोंदवण्यासाठी कस्टमर केअर नंबरवर कॉल करतात आणि त्यांना फसवले जाते. असे बनावट कस्टमर केअर नंबर्समुळे होते.
नवी दिल्ली : आजकाल बनावट ग्राहक सेवा क्रमांक (Customer Care Number) बनवण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता केंद्रातील मोदी सरकारने यावर लगाम घालण्याची तयारी सुरू केली आहे. अनेकवेळा ग्राहक आपली तक्रार नोंदवण्यासाठी कस्टमर केअर नंबरवर कॉल करतात आणि त्यांना फसवले जाते. असे बनावट कस्टमर केअर नंबर्समुळे होते.
गुगलवर असे अनेक फेक नंबर (Fake Numbers) आहेत, जे स्वतःला कोणत्याही बँक, कंपनी किंवा मोबाईल कंपनीचे कस्टमर केअर असल्याचा दावा करतात, त्यावर कॉल केल्यास तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. आता सरकार अशा सर्व बनावट कस्टमर केअर नंबर्सना लगाम घालण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने सर्व कंपन्या आणि अॅप्सना त्यांचे योग्य कस्टमर केअर नंबर्स फक्त प्लॅटफॉर्मवर ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय, प्लॅटफॉर्मवरील सर्व नंबर्स काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्लॅटफॉर्मवरून सर्व नंबर्स हटवले जातील
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकार या बनावट कस्टमर केअर नंबर्सवर नियंत्रण ठेवण्याची तयारी करत आहे. हे बनावट कस्टमर केअर नंबर्स सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवले जातील. त्याचवेळी, सरकारच्या सर्व अॅप्स आणि प्लॅटफॉर्मना त्यांच्या बनावट कस्टमर केअर नंबर्सची पडताळणी करण्यास सांगितले जाईल. पोर्टलवर फक्त खरे नंबर्स उपलब्ध असतील.
स्पॅम कॉल्सवर बंदी
केंद्र सरकारच्या या पावलामुळे योग्य कस्टमर केअर नंबर्स (Customer Care Number) ओळखला जाईल. केंद्र सरकार यासाठी सर्व अॅप्स आणि उद्योगांशी चर्चा करणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या दूरसंचार विधेयकात याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
अशा नंबर्सबाबत व्हा सतर्क!
गुगलवरून (Google) सर्च करून तुम्ही कधीही कस्टमर केअर नंबर्सता वापर करू नये. तुमच्या कोणत्याही समस्या किंवा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या कस्टमर केअर नंबर्सचा नेहमी वापर करा.