्नरस्तारुंदीत बाधितांची महापालिकेकडून फसवणूक

By admin | Published: October 30, 2015 12:16 AM2015-10-30T00:16:32+5:302015-10-30T00:16:32+5:30

पुणे: पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात रस्ता रुंदीकरण प्रस्तावीत करण्यात आले आहे, मात्र याच रस्त्यांच्या यापुर्वी झालेल्या रुंदीकरणात ज्यांनी आपल्या जागा दिल्या त्यांचे महापालिकेने अद्यापही पुर्नवसन केले नसल्याचे दिसते आहे.

Fraud from municipal corporation of obstetricians | ्नरस्तारुंदीत बाधितांची महापालिकेकडून फसवणूक

्नरस्तारुंदीत बाधितांची महापालिकेकडून फसवणूक

Next
णे: पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात रस्ता रुंदीकरण प्रस्तावीत करण्यात आले आहे, मात्र याच रस्त्यांच्या यापुर्वी झालेल्या रुंदीकरणात ज्यांनी आपल्या जागा दिल्या त्यांचे महापालिकेने अद्यापही पुर्नवसन केले नसल्याचे दिसते आहे.
रस्ता रूंदीकरण विरोधी कृती समितीचे समन्वयक नगरसेवक संजय बालगुडे यांनी ही माहिती दिली. महापालिकेने यापुर्वी सन २००७ मध्ये शहरातील काही रस्त्यांवर रुंदीकरणाची मोहिम राबवली. त्यात किमान १ हजार जणांची दुकाने, घरे जात होती. त्यांचा होकार मिळावा यासाठी महापालिकेने त्यांना अनेक आश्वासने दिली. ज्यांची चांगली दुकाने होती त्यांना तुम्हाला भविष्यात हॉकर्स झोनमध्ये जागा देऊ असे लिहून दिले. मात्र इतक्या वर्षांनंतरही महापालिका त्यांचे पुनर्वसन करू शकलेली नाही, किंबहूना त्यांच्याकडे दुर्लक्षच केले गेले आहे अशी टिका बालगुडे यांनी केली.
आता प्रस्तावीत करण्यात आलेले रस्तारूंदीकरणही त्याच मार्गाने जाणार आहे, त्यामुळे पालिकेने यापुर्वी झालेल्या रस्ता रुंदीकरणातील सर्व बाधितांची यादी तयार करावी, त्यांचे समाधानकारक पुनर्वसन करावे अशी मागणी बालगुडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fraud from municipal corporation of obstetricians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.