अजब फ्रॉड! तीन जणांनी मिळून उघडली चक्क SBI ची डुप्लिकेट ब्रॅच, अखेर असं फुटलं बिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 06:26 PM2024-01-05T18:26:54+5:302024-01-05T18:27:31+5:30

Crime News: गुन्हेगारी जगतामधून नेहमीच चित्रविचित्र गुन्हे उघडकीस येत असतात. आता असाच धक्कादायक गुन्हा तामिळनाडूमधून उघडकीस आला आहे. इथे तीन जणांनी मिळून भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ची बनावट शाखा उघडली.

Fraud! Three persons together opened a duplicate branch of SBI, finally the Bing broke | अजब फ्रॉड! तीन जणांनी मिळून उघडली चक्क SBI ची डुप्लिकेट ब्रॅच, अखेर असं फुटलं बिंग

अजब फ्रॉड! तीन जणांनी मिळून उघडली चक्क SBI ची डुप्लिकेट ब्रॅच, अखेर असं फुटलं बिंग

गुन्हेगारी जगतामधून नेहमीच चित्रविचित्र गुन्हे उघडकीस येत असतात. आता असाच धक्कादायक गुन्हा तामिळनाडूमधून उघडकीस आला आहे. इथे तीन जणांनी मिळून भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ची बनावट शाखा उघडली. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास तीन महिने ही शाखा सुरू होती. मात्र अखेरीस या बदमाशांचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी या तिघांनाही बेड्या ठोकल्या. 

तामिळनाडू पोलिसांनी सांगितलं की, एका अकल्पनीय गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोपाखाली पनुर्ती येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही मागच्या तीन महिन्यांपासून भारतीय स्टेट बँकेची बनावट ब्रँच चालवत होते.  अटक करण्यात आलेल्या लौकांपैकी एक जण हा माजी बँक कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.  

पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, या संपूर्ण कटकारस्थानामागचा मास्टरमाईंड कमल बाबू हा होता. कमल बाबूचे आई-वडील माजी बँक कर्मचारी आहेत. त्याच्या वडिलांचा दहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. तर त्याची आई दोन वर्षांपूर्वी एका बँकेतून निवृत्त झाली होती. या प्रकरणातील दुसरा आरोपी हा पनुर्ती येथे एक प्रिटिंग प्रेस चालवतो. तर तिसरा आरोपी रबर स्टँप तयार करण्याचा व्यवसाय करतो.

दरम्यान स्टेट बँकेच्या एका ग्राहकाने जेव्हा पनुर्तीमधील ही शाखा पाहिली आणि बँकेच्या खऱ्या शाखेच्या शाखा व्यवस्थापकाकडे याची तक्रार केली. त्यानंतर या एसबीआयच्या बनावट शाखेचं बिंग फुटलं. नव्या शाखेबाबत ऐकून एसबीआयचे विभागीय अधिकारीसुद्धा अवाक् झाले. त्यानंतर कारवाईची पुढील सूत्रं हलली.

पनुर्तीमध्ये आधीच एसबीआयच्या दोन शाखा असतानाही या आरोपींनी आणखी एक शाखा उघडली. व्यवस्थापकांना केवळ दोन शाखांबाबत माहिती होती. मात्र तिसरी शाखा कादगपत्रांवर कुठेही दिसत नव्हती. जेव्हा याबाबतची माहिती समोर आली तेव्हा अधिकाऱ्यांनी तिची पाहणी करण्यासाठी दौरा केला. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.  

Web Title: Fraud! Three persons together opened a duplicate branch of SBI, finally the Bing broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.