सावधान! सायबर गुन्हेगार टपून बसलेत तुमच्या कमाईवर; महाराष्ट्रात कशी होतेय फसवणूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 07:48 AM2023-12-08T07:48:51+5:302023-12-08T07:49:25+5:30
देशभरात फोटो मॉर्फिंग करून फसवणूक झाल्याचे ६१ गुन्हे घडले असून, त्यामध्ये महाराष्ट्रात १२ गुन्हे दाखल आहेत.
नवी दिल्ली : देशभरात सायबर गुन्हेगारीतून फसवणुकीचे प्रकार वाढले असून, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये हे प्रमाण ४.८ टक्क्यांनी वाढले आहे. महाराष्ट्रातही सायबर फसवणुकीत दरवर्षी वाढ होत असून, २०२२ मध्ये तब्बल ८ हजार २४९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०२० आणि २०२१ मध्ये अनुक्रमे ५४९६ व ५५६२ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक सायबर गुन्हे तेलंगणात समोर आले आहेत.
देशभरात फोटो मॉर्फिंग करून फसवणूक झाल्याचे ६१ गुन्हे घडले असून, त्यामध्ये महाराष्ट्रात १२ गुन्हे दाखल आहेत. फेक प्रोफाईल तयार करून फसवणूक झाल्याच्या देशभरात १५७ घटना घडल्या असून, महाराष्ट्रात ४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजमाध्यमांवर फेक न्यूज पसरवून फसवणूक केल्याचे देशभरात २३० गुन्हे घडले असून, महाराष्ट्रात अशा २३ घटना घडल्या आहेत. सायबर ब्लॅकमेलिंगचे महाराष्ट्रात ९५ गुन्हे घडले आहेत.
‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकू नका अन्यथा...
देशभरात एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संभाषण ‘चॅटिंग’च्या माध्यमातून सुरू करत नंतर ‘न्यूड कॉल्स’च्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार देशात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील / लैंगिक कृत्याचे सर्वाधिक गुन्हे देशात उत्तर प्रदेशमध्ये (२३०९) घडले असून, त्यानंतर कर्नाटक, ओडिशा, आसाम, छत्तीसगड या राज्यांमध्ये घडले आहेत.
महाराष्ट्रात कशी होतेय फसवणूक ?
संगणकाचा वापर करून
इलेक्ट्रॉनिक स्वरूपात
अश्लील / लैंगिक कृत्य
अश्लील साहित्य प्रकाशित करणे
गोपनीयतेचे उल्लंघन