महाविद्यालयांत विनामूल्य प्रवेश तर दहावी उत्तीर्ण झाल्यास मिळतील २० हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 05:52 AM2020-06-09T05:52:01+5:302020-06-09T05:52:09+5:30
दहावी उत्तीर्ण झाल्यास मिळतील २० हजार
गुवाहाटी : आसाम सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली असून त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांवरील आर्थिक ओझे हलके होईल. राज्यात विद्यमान शैक्षणिक वर्षात वर्ग बारावी ते पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांत प्रवेश विनामू्ल्य असेल. विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसह तंत्रज्ञान संस्थांमध्येही हा प्रवेश विनामूल्य असेल. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुल्क (अॅडमिशन फी) द्यावे लागणार नाही.
राज्याचे शिक्षण मंत्री हिमंत बिस्वा यांनी रविवारी ही घोषणा येथे केली व कोणतेही महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून प्रवेशशुल्क घेणार नसल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बिस्वा यांनी अनेक घोषणा केल्या. सरकार वसतिगृहांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रूपये व पुस्तकांसाठी एक हजार रूपये मावेजा देईल. हिमंत बिस्वा म्हणाले, आधी सरकार ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दोन लाख रूपयांपेक्षा कमी होते त्यांना विनामू्ल्य प्रवेश देत होते. परंतु, आता राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयांत विनामूल्य प्रवेश मिळेल. या शिवाय यावर्षी दहावी उत्तीर्ण होणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला २०-२० हजार रूपये दिले जातील.