सत्तेत आल्यास मोफत अयोध्यादर्शन; अमित शहांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 11:18 AM2023-11-19T11:18:49+5:302023-11-19T11:19:56+5:30

गृहमंत्री शाह : राम मंदिर उभारण्यात काँग्रेसकडून वारंवार अडथळे

Free Ayodhya Darshan if comes to power; Amit Shah's announcement | सत्तेत आल्यास मोफत अयोध्यादर्शन; अमित शहांची घोषणा

सत्तेत आल्यास मोफत अयोध्यादर्शन; अमित शहांची घोषणा

हैदराबाद :  तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास त्या राज्यातील जनतेला अयोध्येतील राममंदिरात मोफत दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. गदवाल येथील प्रचारसभेत ते बोलत होते. गेल्या ७० वर्षांमध्ये अयोध्येत राममंदिर उभारण्यात काँग्रेसने अनेक अडथळे आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे शाह यावेळी म्हणाले. 

धर्माच्या आधारावरील आरक्षण रद्द करणार
nतेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विशिष्ट धर्मीयांना धर्माच्या आधारावर दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे. ते रद्द करून भाजपने अन्य मागासवर्गीय व अनुसूचित जमातींच्या आरक्षणात वाढ करण्याचे ठरविले आहे.
nतेलंगणात भाजपचे सरकार आल्यास हा निर्णय घेतला जाईल. काँग्रेस व भारत राष्ट्र समिती हे पक्ष अन्य मागासवर्गीयांच्या विरोधात काम करत आहेत. सत्तेत आल्यास मागासवर्गीय नेत्याला मुख्यमंत्री करू, असेही शाह म्हणाले.

 

Web Title: Free Ayodhya Darshan if comes to power; Amit Shah's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.