फ्री बर्गर पडलं महागात; तरूणाच्या पोटाच्या आतील भागात झाली इजा
By admin | Published: July 10, 2017 09:57 AM2017-07-10T09:57:55+5:302017-07-10T09:57:55+5:30
जास्त बर्गर खाल्ल्याने त्या विद्यार्थ्याच्या पोटातील आतला भाग फाटल्याची घटना घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10- एखादी वस्तू कमी किंमतीत किंवा फ्री मिळणार असेल तर त्याकडे लोकांचा नेहमीच जास्त कल असतो. पण फ्री मिळणारी वस्तू लोकांना कधीकधी जास्त महागातही पडते. याचं उदाहरण नवी दिल्लीमध्ये पहायला मिळालं आहे. तेथिल एका रेस्टॉरन्टमध्ये चिली बर्गर खायची शर्यत भरविण्यात आली होती. सगळ्यात जास्त बर्गर खाणाऱ्याला त्या रेस्टॉरन्टमध्ये एक महिन्याचं जेवण फ्री दिलं जाइल, अशी खास ऑफर ठेवण्यात आली होती. या शर्यतीत दिल्ली विद्यापिठाच्या एका विद्यार्थ्यांने बाजी मारली. पण क्षमतेपेक्षा जास्त बर्गर खाल्ल्याने त्या विद्यार्थ्याच्या पोटातील आतला भाग फाटल्याची घटना घडली आहे. यामुळे त्या विद्यार्थ्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करावी लागली तसंच त्याला लिक्विड डाएटवर रहावं लागलं.
राजोरी गार्डनजवळच्या एका रेस्टॉरन्टमध्ये झालेल्या बर्गर खाण्याच्या स्पर्धेत मी माझ्या मित्रांसह सहभाग घेतला होता. सगळ्यात जास्त बर्गर मी खाल्ले पण दुसऱ्याच दिवशी मला पोटाच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यानंतर रक्ताच्या उलट्याही सुरू झाल्या. डॉक्टरांकडे गेल्यावर चिली बर्गरमुळे हे सगळं होत असल्याचं समजलं, अशी माहिती दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी गर्व गुप्ता याने दिली आहे.
गर्व जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा त्याची परिस्थिती पाहून डॉक्टरसुद्धा हैराण झाले होते. डॉक्टर दीप गोयल यांनी सांगितलं की, त्या मुलाच्या पोटातील आतलं अस्तर फाटलं असल्याचं एन्डोस्कोपी केल्यावर समजलं. पोटाच्या आतील अस्तराचा जेवढा भाग फाटला आहे तो शस्त्रक्रीया करून काढून टाकला आहे. तसंच उरलेल्या भागावर औषधांच्या सहाय्याने उपचार सुरू आहेत. पोटाच्या आतील अस्तर फाटल्याने ते उपचाराने ठीक करणं शक्य नव्हतं म्हणूनच त्याला बाहेर काढावं लागलं, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
गरिबीला कंटाळून महिलेने 5 हजारात केला पोटच्या मुलीचा सौदा
नागपूर वेणा जलाशय दुर्घटनेपूर्वी तरुणांनी केलं होतं फेसबुक लाईव्ह
अबब! तुमच्या जिओचा डेटा होतोय हॅक ?
डॉक्टर गोयल यांच्या माहितीनुसार, पोटाच्या आतील अस्तर पोटाला सुरक्षा देत असतं त्यामुळे त्याला प्रोटेक्टिव्ह लायनिंगही म्हंटलं जातं. पोटाचं विकारांपासून संरक्षण करण्याचं काम याद्वारे केलं जातं. आतील अस्तर खराब झाल्याने पोटाच्या आत अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच पोटाच्या आतील अस्तर (इनर लायनिंग)चं कार्य योग्य होणं गरजेचं आहे.
चिली बर्गर आंबट आणि तिखट अशा दोन्ही चवीचं असतं, त्यामुळे अॅसिडीटी मोठ्या प्रमाणात होते. अती प्रमाणात चिलीचं सेवन केल्याने पोटाच्या आतील भागावर त्याचा थेट परिणाम होतो. विशेष म्हणजे पहिल्यांदा चिली बर्गर खाण्याने पोटाच्या आतील अस्तर फाटल्याचा प्रकार घडला आहे, असं डॉक्टर दीप गोयल यांनी सांगितलं आहे.