‘केजी ते पीजी मोफत शिक्षण’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 06:16 IST2025-01-22T06:15:58+5:302025-01-22T06:16:18+5:30
Delhi Election 2025: भारतीय जनता पक्षाने मंगळवारी आपला दुसरा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात सरकारी शिक्षण संस्थांत गरजू विद्यार्थ्यांना ‘केजी ते पीजी’पर्यंत मोफत शिक्षणाचे आश्वासन दिले आहे.

‘केजी ते पीजी मोफत शिक्षण’
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने मंगळवारी आपला दुसरा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात सरकारी शिक्षण संस्थांत गरजू विद्यार्थ्यांना ‘केजी ते पीजी’पर्यंत मोफत शिक्षणाचे आश्वासन दिले आहे. तसेच घरगुती नोकर तसेच ऑटो व टॅक्सीचालकांसाठी १० लाखांपर्यंतच्या विम्यासह ५ लाखांपर्यंत अपघात संरक्षण देण्याचे नमूद केले. यूपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकरकमी १५ हजार रुपये देण्याचे आश्वासनही यात देण्यात आले.
प्रचारात आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी महिला, विद्यार्थी, वृद्ध, ऑटो-टॅक्सीचालक, घरगुती कामगार, धोबी काम करणारे, फेरीवाले, मंदिरांतील पुजारी, गुरुद्वारांतील ग्रंथी यांच्यासह समाजातील विविध घटकांसाठी मोफत योजनांच्या आश्वासनाची उधळण केली आहे.