मोफत शिक्षण हाच गरिबी संपविण्याचा मार्ग; दिल्ली मॉडेलची देशभर चर्चा : केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:10 AM2024-02-27T10:10:50+5:302024-02-27T10:10:58+5:30
दरवर्षी एक लाख कोटी खर्चून पाच वर्षात मुलांना उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था झाल्यास देशातील गरिबी संपुष्टात येईल. - केजरीवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शिक्षण, आरोग्य आणि विजेच्या या तीन क्षेत्रांमुळे सशक्त राष्ट्राची पायाभरणी करताना देशाचा कसा विकास होऊ शकतो हे दिल्लीने दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभेत म्हणाले.
दरवर्षी एक लाख कोटी खर्चून पाच वर्षात मुलांना उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था झाल्यास देशातील गरिबी संपुष्टात येईल. या देशातील गरिबी संपविण्याचा हा रामबाण उपाय आहे. केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना हा सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
तो व्हिडीओ रिट्विट करून चूक केली
भाजपच्या आयटी विभागाशी संबंधित यूट्युबर ध्रुव राठी यांनी प्रसारित केलेला व्हिडीओ रिट्विट करून आपण चूक केली, असे केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
‘बीजेपी आयटी सेल भाग-२’ हा व्हिडीओ राठी यांनी प्रसारित केला. या व्हिडीओत बदनामीकारक वक्तव्ये केली असल्याचा आरोप करून विकास सांकृत्यायन यांनी खटला दाखल केला.
केजरीवाल यांनी माफी मागितली असल्याने त्यांच्यावरील बदनामीचा खटला तुम्ही मागे घेणार का, अशी विचारणा न्या. संजीव खन्ना, न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने विकास सांकृत्यायन यांच्याकडे केली.