...तर गरिबांना मोफत धान्य-पासवान
By admin | Published: April 4, 2016 10:33 PM2016-04-04T22:33:20+5:302016-04-04T22:33:20+5:30
२०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात रालोआचे सरकार आले तर गरीब कुटुंबांना मोफत तांदूळ आणि गहू वितरित केले जातील
Next
वाराणसी : २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात रालोआचे सरकार आले तर गरीब कुटुंबांना मोफत तांदूळ आणि गहू वितरित केले जातील, असे आश्वासन केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी दिले.
रविवारी वाराणसी येथे भारतीय अन्न महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत पासवान बोलत होते. केंद्र सरकार अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरिबांना वितरित केल्या जाणाऱ्या प्रति किलो गव्हावर १८ रुपये आणि प्रति किलो तांदळावर २८ रुपये सबसिडी देते. त्यामुळे राज्य सरकार गव्हावर दोन रुपये आणि तांदळावर तीन रुपये शुल्क आकारण्याचे थांबवू शकते.