मनपाला पथदिव्यांसाठी मोफत एलईडी बल्ब एकनाथराव खडसे : घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेचा शुभारंभ
By admin | Published: November 4, 2015 11:27 PM2015-11-04T23:27:42+5:302015-11-04T23:27:42+5:30
जळगाव : पथदिवे आणि सार्वजनिक दिवाबत्तीचे लाखो रुपयांचे विजबील थकित राहत असल्यामुळे मनपा, नगरपालिका व ग्रामपंचायती अडचणीमध्ये आहेत. वाढीव स्वरुपात येणारे वीज बिल कमी व्हावे तसेच वीजेची बचत व्हावी यासाठी जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन त्यांच्या हद्दीतील पथदिव्यांसाठी एलईडी दिव्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेच्या शुभारंभप्रसंगी दिली.
Next
ज गाव : पथदिवे आणि सार्वजनिक दिवाबत्तीचे लाखो रुपयांचे विजबील थकित राहत असल्यामुळे मनपा, नगरपालिका व ग्रामपंचायती अडचणीमध्ये आहेत. वाढीव स्वरुपात येणारे वीज बिल कमी व्हावे तसेच वीजेची बचत व्हावी यासाठी जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन त्यांच्या हद्दीतील पथदिव्यांसाठी एलईडी दिव्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेच्या शुभारंभप्रसंगी दिली. जिल्हा नियोजन भवनात बुधवारी सकाळी साडे दहा वाजता या योजनेचा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अशोक पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात जळगाव शहरातील प्रदीप रोटे, किशोर चौधरी, लिलाधर सोनवणे, कमलाकर पाटील, देवीदास पाटील या ग्राहकांना एलईडी बल्बचे वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.आपल्या भाषणात खडसे म्हणाले की, पर्यावरणाचे ढासळते संतुलन आणि वीजेचा होणारा अपव्यय ही मोठी समस्या आपल्या देशापुढे आहे. वीजेची बचत करण्यासाठी जिल्ह्यातील पाच लाख ग्राहकांना कमीत कमी २१ लाख ५० हजार एलईडी बल्बचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एलईडी बल्ब बसविल्यास वर्षभरात एका कुटुंबाची १६०० रुपयांची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्वत्र हे बल्ब बसविल्यास काही दिवसात जळगाव जिल्हा भारनियमन मुक्त करता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.बिलाचा ८० टक्के भार कमी होणार सध्या जळगाव महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. पथदिवे आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार्या वीज दिव्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजबिल मनपाला येत असते. त्यामुळे या योजनेतंर्गत जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन सर्व पथदिव्यावर एलईडी बल्ब बसविण्याची त्यांनी घोषणा केली. या बल्बच्या बदल्यात मनपाकडून एक रुपया घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जळगाव महानगरपालिकेवरील वीज बिलाचा ८० टक्के भार हा कमी होणार आहे. महानगरपालिकेने केवळ देखभाल दुरुस्तीवर लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.