मोफत प्लास्टीक सर्जरी कॅम्प

By admin | Published: July 20, 2016 11:49 PM2016-07-20T23:49:52+5:302016-07-21T01:11:55+5:30

लातूर : लातूर येथील अष्टविनायक प्रतिष्ठान, लातूर वैद्यकीय प्रतिष्ठान व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालया यांच्या संयुक्त विद्यामाने राजीव गांधी जीवानदायी योजने अंतर्गत भाजल्यामुळे आखडलेल्या सांध्यावरील शस्त्रक्रियांचे मोफत प्लास्टीक सर्जरी कॅम्पचे आयोजन लातूरात २९ ते ३१ जुलै या कालावधीत करण्यात आले आहे़

Free Plastic Surgery Camp | मोफत प्लास्टीक सर्जरी कॅम्प

मोफत प्लास्टीक सर्जरी कॅम्प

Next

लातूर : लातूर येथील अष्टविनायक प्रतिष्ठान, लातूर वैद्यकीय प्रतिष्ठान व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालया यांच्या संयुक्त विद्यामाने राजीव गांधी जीवानदायी योजने अंतर्गत भाजल्यामुळे आखडलेल्या सांध्यावरील शस्त्रक्रियांचे मोफत प्लास्टीक सर्जरी कॅम्पचे आयोजन लातूरात २९ ते ३१ जुलै या कालावधीत करण्यात आले आहे़
या कॅम्प मध्ये प्रारंभी भाजलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया पात्रता तपासणी शुक्रवारी गणेश हॉल, अष्टविनायक मंदिर येथे सकाळी ९ ते १ या वेळत करण्यात येणार आहे़ यामध्ये पात्र रुग्णांवर प्रत्येक्ष मोफत शस्त्रक्रिया मात्र शनिवारी व रवीवारी या दोन दिवसांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार येथे केल्या जाणार आहेत़
या कॅम्पमध्ये शस्त्रक्रियेसाठी प्लास्टीक सर्जन डॉ़ अविनाश येळीकर, डॉ़ अनमोड, डॉ़ अजित जगताप, डॉ़ सतिश दशपांडे, डॉ़ शौलेंद्र चौहान, डॉ़ संजय जगताप, डॉ़ उमेश कानडे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूव्दारे केले जाणार आहे़ या शिबीराचा लाभ घेण्यासाठी भाजलेल्या रुग्णांनी पुर्वनांेदणी करणे आवश्यक आहे़ या नोंदणीसाठी रुग्णांनी केशरी, पिवळे, मूळ रेशन कार्ड, अन्नपुर्णा किंवा अत्योदय कार्ड, रुग्णांचे आधार अथवा मतदान कार्ड किंवा पासबुक, फोटो संपूर्ण शरिराचाख व्यंगाचा क्लोजप फोटो, सहा वर्षाखालील मुलामुलीचा आई वडीलांसमवेत फोटो,जन्माचा दाखला ही कागदपत्रे घेऊन रुग्णांनी लातूर अर्बन बँकेच्या मुख्या कार्यालय, शिवाजी नगर, संपर्क क्ऱ९६२३४५९२०,लातूर अर्बन बॅक शाखा खडकेश्वर, औरंगाबाद - संपर्क क्ऱ ९६२३४५४९११, लातूर अर्बन बँक शाखा: वजीराबाद,नांदेड- संपर्क क्ऱ़ ९६२३४५४९०६, सोलापूर येथील टिळक चौक शाखा, क्र ८८८८८८९७६४, पुणे येथील लुल्लानगर शाखा, क्र ़ ९५५२५२१९४७, अष्टविनायक मंदीर लातूर शाखा सविता किटेकर- क्र ़ ७७२००८३५२४, आरोग्य मित्र अनिल शिंदे मो़क्ऱ ़ ८४८३८२९०१८, इ त्यादी टिाकणी नोंदणी करून घेण्यात येणार आहे़तरी या प्लास्टीक सर्जरी कॅम्पचा लाभ गरजूनी ध्यावा असे आवाहन या कॅम्पचे संयोजक अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी, लातूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी़बी़फ ड, अधिष्ठाता डॉ़ अशोक शिंदे व समन्वयक अभय यहा यांनी केले आहे़

Web Title: Free Plastic Surgery Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.