१ कोटी ६६ लाख स्थलांतरित मजुरांना नि:शुल्क शिधावाटप; ६.५७ लाख मेट्रिक टन डाळीचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 05:02 AM2020-12-23T05:02:20+5:302020-12-23T05:02:46+5:30
Free ration : आत्मनिर्भर भारत योजनेतून १.६६ कोटी लाभार्थ्यांना १.६६ लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले.
नवी दिल्ली : टाळेबंदीमुळे स्थलांतरित मजुरांवर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून १ लाख ६६ हजार मेट्रिक टन धान्य उपलब्ध करवून देण्यात आले. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत मजुरांसाठी मोफत अन्न-धान्य उपलब्ध करवून देण्यात आले होते.
शिधापत्रिका नसल्यातरीही आतापर्यंत किती लाभार्थ्यांना धान्यवाटप करण्यात आले
याबाबतचा तपशील केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने जाहीर केला आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेतून १.६६ कोटी लाभार्थ्यांना १.६६ लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले. ज्यांना सुरक्षा कवच नाही, अशा कामगारांना होणारा त्रास लक्षात घेऊन सरकारच्या बफर स्टॉकमधून दोन किलो हरभरे पुरविण्याची तरतूद करण्यात आली.