मू.जे.प्राचार्यांचा मार्ग मोकळा
By admin | Published: February 12, 2016 12:49 AM2016-02-12T00:49:17+5:302016-02-12T00:49:17+5:30
जळगाव : मू.जे महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्य पदाच्या मान्यतेसाठी उमविने त्यांना एपीआय (अकॅडमीट परफॉरमन्स इंडिकेटर) तपासून घेण्यासंबंधाच्या सूचना दिल्या होत्या. मात्र औरंगाबाद विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या तपासणीत त्यांचे मूल्यांकर क्लॅपिंगसह ४४७.२ मार्क मिळाले आहे. उमविने मात्र त्यांचे मूल्यांकन ३३१.७७ इतके केले होते. याबाबत औरंगाबाद विद्यापीठाकडून प्राचार्यांना अहवालाची प्रत प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याचा प्राचार्य पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Next
ज गाव : मू.जे महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्य पदाच्या मान्यतेसाठी उमविने त्यांना एपीआय (अकॅडमीट परफॉरमन्स इंडिकेटर) तपासून घेण्यासंबंधाच्या सूचना दिल्या होत्या. मात्र औरंगाबाद विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या तपासणीत त्यांचे मूल्यांकर क्लॅपिंगसह ४४७.२ मार्क मिळाले आहे. उमविने मात्र त्यांचे मूल्यांकन ३३१.७७ इतके केले होते. याबाबत औरंगाबाद विद्यापीठाकडून प्राचार्यांना अहवालाची प्रत प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याचा प्राचार्य पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी प्राचार्य पद सांभाळल्यानंतर उमविकडे ॲप्रुव्हलसाठी आपला प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावात विद्यापीठाने त्रुटी काढत. त्यांनी एपीआय उमविकडून तपासून घेण्याच्या सूचनेच्या विरुद्ध औरंगाबाद उच्च न्यायालायात प्राचार्य कुलकर्णी व के.सी.ई संस्थेने स्वतंत्र दोन याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवरील सुनावणीत प्राचार्य कुलकर्णी यांचा एपीआय तपासणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून तपासून घेण्याचे आदेश दिले होते. यात प्राचार्य यांनी आठ दिवसात आपला अहवाल तयार करून या विद्यापीठात देण्याचे व विद्यापीठाने याबाबत दोन आठवड्यात अहवाल देण्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार विद्यापीठाने प्राचार्य कुलकर्णी यांच्या एपीआयमध्ये क्लॅपिंगसह ४४७.२ मार्क देण्यात आले आहे. विद्यापीठाला ॲप्रुव्हल देण्यासाठी चारशे मार्कांची आवश्यकता असते. उमवितर्फे करण्यात आलेल्या मूल्यांकनात त्यांना ३३१.७७ मार्क देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या प्राचार्य पदावर गदा येणार होती. प्राचार्य पदावर नियुक्ती पूर्वी प्राचार्यांनी पुणे विद्यापीठातून मूल्यांकन केले होते त्यात त्यांना क्लॅपिंगसह ४१७.२ मार्क मिळाले होते. मात्र आता त्यांचा प्राचार्य पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.कोटमराठवाडा विद्यापीठाकडून क्लॅपिंगसह ४४७.२ मार्क मिळाल्या संंबंधातील पत्र मिळाले आहे. आमचा पुढील मार्ग मोकळा झालाआहे. न्याय मिळाला आहे.- उदय कुलकर्णी प्राचार्य, मू.जे. महाविद्यालय.