शशिकलांचा मार्ग मोकळा

By Admin | Published: February 7, 2017 02:21 AM2017-02-07T02:21:07+5:302017-02-07T02:21:07+5:30

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचा राजीनामा राज्यपालांनी सोमवारी स्वीकारला.त्यामुळे व्ही. के. शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Free the route of the workshops | शशिकलांचा मार्ग मोकळा

शशिकलांचा मार्ग मोकळा

googlenewsNext

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचा राजीनामा राज्यपालांनी सोमवारी स्वीकारला.त्यामुळे व्ही. के. शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनीरसेल्वम यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत रविवारी पदाचा राजीनामा दिला होता.
अद्रमुक प्रमुख शशिकला यांची पक्ष विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे राजीनामापत्र सादर केले होते. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळाने काम पाहावे, असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. मात्र शशिकला यांच्या शपथविधीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाख़ल झाली आहे. शपथविधी उद्याच होणार आहे. जयललिता यांच्यासह शशिकला यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपाच्या खटल्याचा निकाल लवकरच लागणार आहे. तो लागेपर्यंत शशिकला यांचा शपथविधी होता नये, अशी ही याचिका आहे. मात्र न्यायालयाने त्याआधारे न्यायालयाने शपथविधी स्थगिती दिलेली नाही.
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का?
मुख्यमंत्री दिवंगत जे. जयललिता यांची पहिली पसंत असूनही ओ. पनीरसेल्वम यांनी शशिकलांसाठी मुख्यमंत्रीपद का सोडले, असा सवाल अद्रमुकचे माजी मंत्री के. पी. मुनुसामी यांनी केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री बनण्यासाठी शशिकला यांनी कोणता त्याग केला किंवा कोणता राजकीय इतिहास घडविला, असा सवालही त्यांनी केला. कोणताही राजकीय त्याग किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना अम्मांच्या निधनानंतर केवळ ६० दिवसांत त्यांनी पाठीमागील दरवाजाने प्रवेश केला, असा घणाघात त्यांनी केला.


रक्तसंसर्गामुळे जयललिता यांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा मृत्यू रक्तातील संसर्गामुळे झाल्याचा दावा त्यांच्यावर अपोलो इस्पितळात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सोमवारी केला. जयललिता यांना मधुमेह होता. त्यामुळे आजारपणात त्यांचे काही अवयव निकामी होत गेले. त्यांना नंतर श्वास घेणेही अवघड झाले होते, असे डॉ. रिचर्ड बेले यांनी सांगितले.

त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले, त्या वेळी त्या बोलण्याच्याही स्थितीत नव्हत्या, असे ते म्हणाले. मात्र, ही सारी माहिती आज अचानक का देण्यात आली, याची चर्चा तामिळनाडूमध्ये सुरू झाली आहे.

शशिकला यांची मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांनी निवड केल्यानंतर आणि त्यांचा शपथविधी उद्या होणार असतानाच अपोलोच्या डॉक्टरांनी पत्रपरिषद घेतल्याबद्दल तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी या आधीच काही जण न्यायालयात गेले आहेत. तशी मागणी झाल्यावरही अपोलोतर्फे ही माहिती जाहीर कणऱ्यात आली नव्हती,

त्या पात्र आहेत का?
शशिकला यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येत असल्याबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी अद्रमुकवर टीका केली आहे. शशिकला मुख्यमंत्री बनण्यास पात्र आहेत का, असा प्रश्न विचारण्याचा तामिळनाडूच्या जनतेला पूर्ण अधिकार आहे, असेही ते म्हणाले. आपल्या नेत्याची निवड करणे हा अद्रमुक आमदारांचा अधिकार आहे. तथापि, तो नेता मुख्यमंत्री बनण्यास योग्य आहे किंवा नाही हे विचारण्याचा जनतेला पूर्ण अधिकार आहे.

Web Title: Free the route of the workshops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.